Urea Fertilizer

Urea Fertilizer । शेतकऱ्यांनो सावधान! ‘या’ पिकासाठी चुकूनही वापरू नका युरिया, नाहीतर आर्थिक नुकसान झालेच समजा

कृषी सल्ला

Urea Fertilizer । भरघोस उत्पादन मिळवण्यासाठी शेतकरी दिवसरात्र शेतात मेहनत करतात. पिकांना वेळेत पाणी, त्यांची मशागत आणि खतांचा (Fertilizers) वापर केला की पीकदेखील जोमाने येते. हल्ली शेतकरी रासायनिक खतांचा (Chemical fertilizers) जास्त वापर करत आहेत. या खतांमुळे पिकाची वाढ दुपटीने होते. (Uses of Fertilizers) पण ही खते जास्त प्रमाणात वापरली तर त्याचा पिकांवर विपरीत परिणाम होतो.

Onion । ‘या’ तंत्रज्ञानामुळे साठवणूक केलेला कांदा कधीच सडणार नाही, कसे ते जाणून घ्या

शेतकरी रासायनिक खतांमध्ये युरिया या खताचा सर्वात जास्त वापर होत आहे. युरिया खत पिकातून विक्रमी उत्पादन मिळवण्यासाठी फायद्याचे आहे. वास्तविक युरिया हे नायट्रोजनचा पुरवठा करते आणि नायट्रोजन (Nitrogen) हे पिकाच्या वाढीसाठी खूप फायदेशीर आहे. जर नायट्रोजनची कमतरता भासली तर पिकातून अपेक्षित उत्पादन मिळत नाही. (Urea Fertilizer Disadvantage)

TOP 5 Tractor Under 3 Lakh । हे आहेत भारतातील सर्वात स्वस्त ट्रॅक्टर, मिळेल शक्तिशाली इंजिन आणि फीचर्स

नायट्रोजनची कमतरता दूर करण्यासाठी युरिया खताचा वापर काही पिकांमध्ये खूपच फायदेशीर असतो. हे लक्षात घ्या की युरियाचा जर योग्य पद्धतीने वापर झाला तर पिकातून चांगले उत्पादन मिळवता येते. पण काही अशी पिके आहेत ज्यामध्ये युरियाचा वापर केला म्हणजेच नत्राच प्रमाण जास्त झालं तर त्या पिकाला याचा सर्वात मोठा फटका बसतो.

Budget 2024 । कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, अर्थसंकल्पात सरकारकडून मिळणार मोठे गिफ्ट

पिकांमध्ये करू नये युरियाचा वापर

कृषी तज्ञांच्या माहितीनुसार, हरभरा, तूर आणि मूग यांसारख्या दाळवर्गीय पिकांमध्ये युरियाचा चुकूनही वापर करू नये. तसेच कापूस, ताग यासारख्या तंतुमय पिकांमध्ये देखील युरियाचा वापर करणे टाळावे. टोमॅटो, वांगी आणि मिरचीच्या पिकात युरियाचा वापर करू नये. जर तुम्ही या पिकांमध्ये युरियाचा वापर केला तर तुम्हाला आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागेल.

Agriculture News । कामाची बातमी! 1 हेक्टर जमीन असल्यास तरीही शेतकऱ्यांना मिळणार 7 लाख रुपये, मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *