Agriculture News । शेतकऱ्यांना सतत कोणत्या ना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्यांमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट निर्माण होते. अनेक शेतकरी आर्थिक संकट आल्याने टोकाचा निर्णय घेतात. यामुळे त्या शेतकऱ्याचे संपूर्ण कुटुंब उध्वस्त होते. याच कारणामुळे केंद्र आणि राज्य सरकारने विविध योजनांना सुरुवात केली आहे.
ज्याचा लाभ देशभरातील लाखो शेतकरी घेत आहेत. पण असेही काही शेतकरी आहेत, जे सरकारी लाभापासून वंचित असतात. जर कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करायचे असेल तर बांबू लागवड (Bamboo Cultivation) हा एक उत्तम पर्याय असेल असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे. नुकत्याच झालेल्या पर्यावरणीय शाश्वतता शिखर परिषदेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बोलत होते. (Bamboo Cultivation Subsidy)
Crop Damage Compensation । चिंताजनक बातमी! ‘या’ कारणामुळे रखडली शेतकऱ्यांची नुकसानभरपाई
बांबू लागवडीसाठी मिळणार अनुदान
त्यावेळी त्यांनी बांबू लागवड हा हवामान बदलावर योग्य पर्याय ठरेल,असे मत व्यक्त केले. महाराष्ट्रात दहा हजार हेक्टर क्षेत्रावर याची लागवड होईल, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. बाबू लागवडीमुळे पर्यावरणाचे संवर्धन तर होणारच आहे. तसेच शेतकऱ्यांचे अर्थकारण देखील मजबूत होईल. याच कारणामुळे आता शासनाच्या माध्यमातून देखील बांबू लागवडीसाठी (Bamboo Cultivation Schemes) प्रोत्साहन देण्यात येत आहे, अशी माहिती शिंदे यांनी दिली आहे.
Ujani Dam । बळीराजासाठी आनंदाची बातमी! उजनीतून शेतीसाठी साेडले पाणी
किती मिळणार अनुदान?
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बांबू लागवड करावी, असे आवाहन देखील शिंदे यांनी यावेळी केले आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे बांबू लागवड ही उसाच्या शेतीपेक्षा फायदेशीर आहेत. जर शेतकऱ्यांनी बांबूची लागवड केली तर यातून शेतकऱ्यांचे आर्थिक परिस्थिती सुधारेल. सरकारच्या माध्यमातून प्रती हेक्टर सात लाख रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे.
Milk Subsidy । दूध उत्पादकांना मोठा धक्का! दुधात पुन्हा ५ ते ६ रुपयांची घसरण
हल्ली अनेक शेतकरी पारंपरिक शेती पद्धत सोडून आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत. आधुनिक पद्धतीने शेती केल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न यामुळे वाढण्यास मदत होत आहेत. सरकार देखील शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरु करत असते. ज्याचा त्यांना खूप लाभ होतो.