Government Schemes । सरकार आता विविध व्यवसायासाठी, शेतीसाठी अनुदान उपलब्ध करून देत आहे, ज्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. सरकार आता फळ पिकांना स्वयंचलित ठिबक सिंचन योजनेसाठी अनुदान (Automation Thibak Subsidy) देत आहे. महत्त्वाचे म्हणजे याबाबत शेतकऱ्यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे एक निवेदन देण्यात आले होते.
आता केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेमध्ये राज्य सरकारने सुचवलेली सुधारणा स्वीकारत ऑटोमेशन म्हणजेच स्वयंचलित ठिबक प्रणाली विकसित करण्यासाठी प्रति हेक्टरी 40 हजार रुपये अनुदान (Subsidy) दिले जाणार आहे. कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ, ऑटोमेशन क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच अनुभवी शेतकऱ्यांची एक समिती याबाबतचे निकष निश्चित करेल.
मागील महिन्यात मुंडे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे शिवार फेरी कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते. तेव्हा बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी सचिन अग्रवाल यांनी मुंडेंना संत्रा फळ पिकाची गळती झाली असून स्वयंचलित ठिबक सिंचन प्रणाली बसवण्यासाठी अनुदान दिले जावे, अशी विनंती निवेदनाद्वारे देण्यात आली होती.
मिळणार 40 हजारांचे अनुदान
या निवेदनाचा मुंडे यांनी पाठपुरावा केला. यापूर्वी मुंडे यांनी भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेत संत्रा कलमासाठी प्रति कलम 70 रुपये प्रमाणे अनुदान, सेंद्रिय आणि रासायनिक खतांसाठी 100 टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला. आता स्वयंचलित ठिबक सिंचन प्रणाली बसवण्यासाठी 40 हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
Paddy Farming । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ पिकाला मिळणार बोनस, सरकारची मोठी घोषणा
या योजना कृषी क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून तसेच पीक उत्पादन वाढीसाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत. अनेक योजना या शेतीसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याकरिता खूप फायद्याच्या आहेत. तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टिकोनातून या योजनांचे महत्त्व खूप आहे.
Jaykwadi Dam Water । सर्वात मोठी बातमी! ‘या’ धरणांमधून जायकवाडीत सोडणार पाणी