Success Story

Success Story । दुधाला दर नसल्याने शेतकऱ्याने केला स्वतःचा पेढे बनविण्याचा व्यवसाय सुरु; आता अख्ख्या गावाचं दूध घेतो..गावातील डेअरी पडल्या बंद

पशुसंवर्धन

Success Story । मागच्या काही दिवसांपासून दुधाचे दर खूप कमी (Milk Price Falls Down) झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. पशूंच्या चाऱ्याच्या किमती खूप वाढल्या आहेत. चाऱ्याच्या किमती वाढल्याने पशुपालक आर्थिक संकटात आले आहेत. एकंदरीतच पशुपालनाचा व्यवसाय तोट्यात आला आहे. याच गोष्टीचा विचार करून बीडच्या एका ३५ वर्षीय व्यक्तीने एक अनोखा प्रयोग केला आहे. (Success Story)

Electricity Issue । दिलासादायक! वीजयंत्रणा धोकादायक असल्यास व्हॉट्सअॅपवर करता येणार तक्रार, कसं ते जाणून घ्या

बीडमधील एका व्यक्तीने दूध डेरीला घालणे परवडत नसल्याने स्वतःच पेढे बनविण्याचा व्यवसाय सुरु केला आहे. पहिल्यांदा स्वतःच्या घरच्या गाईचे दूध यासाठी वापरले जात होते. यानंतर हळूहळू परिसरातील सर्वच शेतकरी या ठिकाणी दूध विक्री करू लागले. डेअरीपेक्षा शेतकऱ्यांना या ठिकाणी दुधास चांगला दर मिळत असल्याने अनेक शेतकरी या ठिकाणी दूध घालतात. बीड जिल्ह्यातील सांद्रवन गावातील एक ३५ वर्षीय व्यक्ती संपूर्ण व्यवसाय पाहात आहे.

Subsidy for Fodder Seeds । खुशखबर! १०० टक्के मिळणार चारा बियाण्यांसाठी अनुदान, जाणून घ्या अर्जप्रक्रिया

या शेतकऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ते परिसरातील इतर शेतकऱ्यांचे जवळपास दररोज २२० लिटर दूध संकलन करतात आणि त्यापासून पेढे बनवून विकतात. जवळपास १५ ते २० शेतकरी या ठिकाणी दूध घालत असून त्यांच्या दुधाला योग्य दर देखील मिळत आहे. मागच्या चार वर्षांपासून हा व्यवसाय सुरु असून गावातील सर्व शेतकरी या ठिकाणी दूध घालतात. तेथील परिसरातील सर्व दूध डेअरी बंद झाल्या असून सध्याच्या घडीला फक्त एक दूध डेअरी त्या ठिकाणी चालू आहे.

Paddy Farming । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ पिकाला मिळणार बोनस, सरकारची मोठी घोषणा

शेतकरी या दुधाचे संकलन करतो त्यानंतर त्याचा खवा बनवून पेढे बनविले जातात. यानंतर याची विक्री बाजारातील पेढे विक्रत्यांकडे केली जाते. दररोज २०० ते २५० लिटर दूध संकलन होत असून त्यावर प्रक्रिया होऊन दररोज जवळपास २५ किलो खवा या ठिकाणी बनवला जातो. यांच्याकडील खवा हा ३०० रुपये किलोने विकला जातो. तर पेढे २०० रुपये किलोने विकले जातात. तुम्ही देखील या शेतकऱ्यासारखा ग्राम उद्योग उभारून चांगला नफा कमावू शकतात.

Jaykwadi Dam Water । सर्वात मोठी बातमी! ‘या’ धरणांमधून जायकवाडीत सोडणार पाणी

बीडच्या या शेतकऱ्याने एकदम सध्या पद्धतीने, कमी खर्चात व्यवसाय सुरु केला आहे. हे शेतकरी स्वतः बाजारात जाऊन देखील पेढ्याची आणि खव्याची विक्री करतात. त्याचबरोबर त्यांच्या दुकानात येऊन देखील अनेकजण खवा आणि पेढे खरेदी करतात.

Accidental Insurance । सरकारचा मोठा निर्णय! अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबाला मिळणार २ लाख रुपये, काय आहे योजना? जाणून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *