Subsidy for Fodder Seeds । भारतात शेतीसोबत मोठ्या प्रमाणावर पशुपालन केले जाते. परंतु सध्या पशुपालनाचा व्यवसाय अडचणीत आला आहे. याला कारण आहे ते म्हणजे दुधाचे पडलेले दर (Milk Price) आणि अपुरा चारा. कमी पावसामुळे चाऱ्याचे प्रमाण घटले आहे. हिवाळ्याच्या दिवसातच चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाल्याने पशुपालक चिंतेत पडले आहेत. अशातच आता एक दिलासादायक बाब आहे.
शेतकऱ्यांना आता चारा बियाण्यांसाठी १०० टक्के अनुदान मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतावर वैरणीचे उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राज्य सरकारच्या मार्फत वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रम हाती(Subsidy for Seeds) घेतला आहे. जर तुम्हाला या अनुदानाचा (Subsidy) लाभ घ्यायचा असेल तर अर्जासाठी काही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. सोप्या पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता.
Paddy Farming । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ पिकाला मिळणार बोनस, सरकारची मोठी घोषणा
या ठिकाणी करा अर्ज
- या योजनेंतर्गत प्रस्ताव मंजूर करणे आणि प्रत्यक्ष निधी वितरणाकरिता पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. तुम्ही जवळच्या पशूवैद्यकीय दवाखान्यांशी संपर्क साधू शकता.
- गावातील पशू वैद्यकीय कार्यालयात अर्ज मिळतील.
Jaykwadi Dam Water । सर्वात मोठी बातमी! ‘या’ धरणांमधून जायकवाडीत सोडणार पाणी
जाणून घ्या अटी
- वैरण बियाणांचा पुरवठा करत असताना लाभार्थीकडे वैरण उत्पादनासाठी स्वतःची शेतजमीन आणि सिंचनाची सुविधा असावी.
- बरसिम, ज्वारी, मका, बाजरी, लुसर्न, न्यूट्रीफिड व इतर बियाणे तसेच नेपियर, यशवंत, जयवंत इ. सुधारित बहुवर्षीय गवत प्रजातींची ठोंबे वाटप करावी.
- प्रति लाभार्थी एक एकरच्या क्षेत्रात वैरण उत्पादन घेण्यासाठी १०० टक्के अनुदानावर ४ हजार रुपयांच्या मर्यादेत वैरणीच्या बियाणांचा पुरवठा केला जाईल.
- तसेच वैरण बियाणे आणि ठोंबांची खरेदी राष्ट्रीय बियाणे महामंडळ, राज्य बियाणे महामंडळ (महाबीज), महाराष्ट्र पशुधन विकास मंडळांतर्गतची प्रक्षेत्रे, इतर शासकीय संस्था, कृषी विद्यापिठे, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळांतर्गतची प्रक्षेत्रे यांच्याकडून केली जावी.
- बियाणांचे वाटप करण्याअगोदर लाभार्थ्यांना वैरण पिकांच्या लागवडीबाबत तांत्रिक मार्गदर्शन करावे.
- हंगामानुसार वैरण पिकांची निवड करावी.
- वैरणीच्या पीक/ठोंबाकरिता आवश्यक खते, जीवाणू संवर्धके शेतकऱ्याने स्वतःच्या खर्चाने विकत घ्यावीत.
- कोणत्याही प्रवर्गातील शेतकऱ्यांना लाभ घेता येणार आहे.
- एका हंगामात एकदाच लाभ मिळेल.
- अनुदानाची रक्कम संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरणाद्वारे केली जाईल.
- मुरघास वापरासाठी अनुदान, टीएमआर वापरासाठी प्रोत्साहनपर अनुदान आणि खनिज मिश्रणासाठी अनुदान या उपघटकांतर्गत ज्या लाभार्थ्याकडे दुधाळ आणि गाभण पशुधन असणाऱ्यांना लाभ मिळेल.
- निर्णयात अंतर्भूत असणाऱ्या वेगवेगळ्या ६ उपघटकांसाठी लाभार्थ्यांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्राप्त करून घेतले जातील आणि त्यांनतर लाभार्थ्यांची निवड केली जाईल.