Electricity Issue

Electricity Issue । दिलासादायक! वीजयंत्रणा धोकादायक असल्यास व्हॉट्सअॅपवर करता येणार तक्रार, कसं ते जाणून घ्या

बातम्या

Electricity Issue । कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे शेतकरी संकटात आहेत. अशातच विजेचा लपंडाव सुरु आहे. त्यामुळे सर्वच शेतकऱ्यांवर दुहेरी संकट आले आहे. काहीशा प्रमाणात असणारे पाणीही शेतकऱ्यांना शेतीला देता येत नाही. असे असल्याने सर्व शेतकऱ्यांमध्ये महावितरणाविरोधात (Electricity) असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Paddy Farming । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ पिकाला मिळणार बोनस, सरकारची मोठी घोषणा

त्यात वीजतारा तुटणे, झोल पडणे, फिडर पिलरचे दरवाजे तुटणे किंवा भूमिगत केबल उघड्यावर पडणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो. अनेकदा मोठा अनर्थ देखील होतो. महावितरणकडे तक्रार केली तर त्याकडे उशिरा लक्ष दिले जाते. परंतु, आता ही समस्या दूर होणार आहे. कारण जर इथून पुढे वीजयंत्रणा धोकादायक असेल तर त्याबाबत तुम्हाला तातडीने व्हॉट्सअॅपवर (WhatsApp) तक्रार करता येणार आहे.

Jaykwadi Dam Water । सर्वात मोठी बातमी! ‘या’ धरणांमधून जायकवाडीत सोडणार पाणी

अशी करा तक्रार

सोलापूर जिल्ह्यासाठी ७८७५४४०४५५, कोल्हापूर – ७८७५७६९१०३, सांगली – ७८७५७६९४४९ आणि सातारासाठी ७८७५७६८५५४ हा व्हॉट्सअॅ नंबर असेल. पुणे परिमंडलअंतर्गत व्हॉट्सॲप नंबर पुणे आणि पिंपरी-चिंचवड, मुळशी, हवेली, वेल्हे, मावळ, खेड, जुन्नर तसेच आंबेगाव तालुक्यांसाठी ७८७५७६७१२३ या व्हॉट्सअॅप नंबरवर तक्रार करता येणार आहे. बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर आणि भोर या तालुक्यांसाठी ७८७५७६८०७४ हा व्हॉट्सअॅप व्हॉट्सअॅप नंबरवर तक्रार (Electricity complaint) करता येणार आहे. महावितरणकडून हे नंबर उपलब्ध करून दिले आहे.

Accidental Insurance । सरकारचा मोठा निर्णय! अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबाला मिळणार २ लाख रुपये, काय आहे योजना? जाणून घ्या

महावितरणची वीजतार तुटली, तारेचा झोल किंवा तार जमिनीवर लोंबळकत असल्यास किंवा फ्यूज पेट्या किंवा फिडर पिलरचे झाकणे उघडे किंवा तुटलेले असेल तर तुम्ही ही माहिती व्हॉट्सअॅपवर पाठवू शकता. तुम्हाला याबाबत तक्रारी छायाचित्रांसोबत संबंधित स्थळाच्या संपूर्ण पत्त्याचा उल्लेख किंवा लोकेशन समाविष्ट करावे लागणार आहे.

Farmer Success Story । शेतकऱ्याचा नादच खुळा! साडे सहा एकर जमिनीतून पपई आणि टरबूज विकून कमावले 42 लाख रुपये; असं केलं नियोजन?

तक्रार लगेचच संबंधित विभागीय आणि उपविभागीय कार्यालयात पाठविली जाईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे काही तक्रारींचे निवारण करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयांची मंजुरी, निधी किंवा शिफ्टिगची गरज असेल तर त्या संदर्भात प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविले जातील.

Havaman Andaj । मोठी बातमी! पुढील २४ तासांत या ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *