Unseasonal Rain

Unseasonal Rain । शेतकऱ्यांना मोठा फटका! अवकाळी पावसामुळे ३८ हजार हेक्‍टरवरील शेतीचे नुकसान

बातम्या

Unseasonal Rain । शेतकऱ्यांना दरवर्षीप्रमाणे यंदाही निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसला आहे. ऐन थंडीच्या दिवसात देशाच्या अनेक भागात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain in Maharashtra) थैमान घातले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे (Rain in Maharashtra) हजारो हेक्‍टरवर असणारी शेती अक्षरशः जमीनदोस्त झाली आहे.

Success Story । शेतकऱ्याची बातच न्यारी! विषमुक्त स्ट्रॉबेरी शेती पॅटर्न, कमी खर्चात मिळतंय जास्त उत्पन्न

विदर्भात सर्वात जास्त फटका

नवीन वर्षात देखील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा (Hailstorm) फटका सहन करावा लागतोय. विदर्भामध्ये देखील अवकाळी पावसाचा तडाखा फटका बसला आहे. विदर्भामध्ये मागील दोन दिवसांत झालेल्या गारपीट, पावसामुळे एकूण ३८ हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. यवतमाळ जिल्ह्यात सर्वात जास्त ९७८९ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

Land Acquisition Act । काय आहे भूसंपादन कायदा? शेतकऱ्यांना त्याचा कसा होतो फायदा? जाणून घ्या

सध्या या भागात सर्वेक्षणाचे काम सुरू आहे, त्यामुळे इतर काही जिल्ह्यांची आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही. दरम्यान, नोव्हेंबर महिन्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसानंतर आता पुन्हा एकदा विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना अवकाळी पाऊस, गारपिटीचा फटका बसला. विदर्भात १० आणि ११ फेब्रुवारी असे सलग दोन दिवस पावसाची नोंद करण्यात आली आहे.

Agriculture News । मोठी बातमी! देशातील 199 आणि राज्यातील 11 कृषी हवामान केंद्र बंद होणार

या बाधितांमध्ये पूर्व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांचा समावेश असून अकोला, बुलडाणा या जिल्ह्यांत कोणतेच नुकसान झाले नाही, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच अवकाळी पाऊस, गारपिटीचा सर्वात जास्त फटका नागपूर जिल्ह्याला बसला आहे. ११ तालुक्यांतील ३६३ गावे बाधित झाली असून यात ११७०० शेतकऱ्यांचे ९५० हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. बाभूळगाव (यवतमाळ) जिल्ह्यात ३१४० आणि उमरखेड तालुक्‍यात ६०७२ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

Farmers Protest । काय आहे हमीभाव कायदा? ज्यासाठी केले जातेय आंदोलन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *