Crop music therapy

Crop music therapy । ऐकावं ते नवलच! हा शेतकरी आपल्या पिकाला ऐकवतोय चक्क संगीत, कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का

बातम्या

Crop music therapy । शेतकरी आता शेतीत (Agriculture) अनेक प्रयोग करू लागले आहेत. त्यातून त्यांना लाखो रुपयांची कमाई देखील करता येत आहे. जास्त कमाई करता येत असल्याने काहीजण लाखो रुपयांची असलेली नोकरी सोडून शेती करत आहेत. शेतकरी पिके (Crop) चांगली येण्यासाठी काहीही करतो. अशाच एका शेतकऱ्याने केले आहे, ज्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Land Rule । तुमचाही शेतात जाणारा रस्ता अडवला आहे? काळजी करू नका, फक्त करा ‘हे’ काम

पिकांसाठी म्युझीक थेरपी

गणेश चौधरी (Ganesh Chaudhary) असे या शेतकऱ्याचं नाव आहे. धुळे (Dhule) जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांच्या यादीत त्यांचे नाव आहे. इतकेच नाही तर उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत जास्त मक्याचे पीक घेणारा शेतकरी म्हणून त्यांची ओळख असल्याचंही ते दावा करतात. परंतु, या शेतकऱ्याने चक्क आपल्या शेतात साऊंड लावला असून ते आपल्या पिकांसाठी सुमधूर संगीत (Music therapy) ऐकवतात.

Success Story । स्वप्नाला मुरड घालून केली सीताफळ लागवड, लाखात होतेय कमाई

ते दररोज पहाटे सुर्य उगवण्याच्या अगोदर आणि सायंकाळच्या सुमारास ते संगीत लावतात. यावेळी केवळ आणि केवळ पिकांसाठी बासरी, शास्त्रीय संगीत किंवा धूनच वाजवली जाते. पिकांना कोणत्याही प्रकारचे अल्बम, बॉलीवूड, धांगडधिंगा गाणे ऐकवले जात नाहीत. यामागचे कारण जाणून तुम्हालाही खूप मोठा धक्का बसू शकतो. (Music therapy for crop)

Farmer March । महाविकास आघाडीच्या ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’ला आजपासून सुरुवात, असणार ‘या’ महत्त्वाच्या मागण्या

जाणून घ्या यामागचं कारण

या संगितामुळे शेतात आणि वातावरणात सकारात्मकता तयार होते, याचा फायदा पीक वाढीसाठी होईल असं गणेश चौधरी सांगतात. जरी पिकाच्या उत्पादनात फार काही फरक पडणार नसला तरी पण टक्केवारीमध्ये थोडासा फरक पडेल अशी त्यांना खात्री आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या देशातही पिकांच्या पोषक वाढीसाठी म्युझिक थेरपीचा वापर करण्यात येतो.

Havaman Andaj । मोठी बातमी! राज्याला पुन्हा बसणार अवकाळीचा फटका, शेतकऱ्यांवर अस्मानी संकट

‘पीक हे माझं बाळ आहे. संगीताच्या लहरीमुळे बाळाला सकारात्मकता मिळते, त्याशिवाय संगीतामुळे मुक्या प्राण्यांनाही चांगले वाटते, ज्या सजीवाला भावना असतात त्या प्रत्येक सजीवाला संगीतामुळे साकारात्मकता जाणवते. संगीताच्या माध्यमातून पिकाच्या भावना जपल्या जातील असं मला वाटतं आणि मी तसा प्रयत्न करतो’, असे गणेश चौधरी सांगतात.

Leopards Attack । ऊसतोड कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर, बिबट्याच्या वावराने भीतीचे वातावरण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *