Success Story

Success Story । स्वप्नाला मुरड घालून केली सीताफळ लागवड, लाखात होतेय कमाई

यशोगाथा

Success Story । सध्याच्या काळात पैशाला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. पैशांशिवाय कोणतीच वस्तू विकत घेता येत नाही. अनेकांकडे एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी पुरेशा प्रमाणात पैसे उपलब्ध नसतात. अशावेळी ती व्यक्ती कर्ज (Loan) काढते किंवा आपल्या मित्रांकडे पैसे उधार मागते. पैसे नसल्याने अनेकांना आपले शिक्षण पूर्ण करता आले नाही. त्यावेळी अनेकजण दुसरा मार्ग शोधतात.

Farmer March । महाविकास आघाडीच्या ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’ला आजपासून सुरुवात, असणार ‘या’ महत्त्वाच्या मागण्या

स्वप्नाला मुरड घालून केली सीताफळ लागवड

असेच काहीसे वाशीममध्ये (Washim) घडले आहे. विलास जाधव (Vilas Jadhav) हे उच्च शिक्षित असून त्यांना शिक्षक व्हायचे होते. त्यांना त्यांचे स्वप्न स्वस्थ झोपू देत नव्हते. परंतु, जसजसा काळ बदलत गेला तसतशी त्यांच्यावर जबाबदाऱ्या येऊ लागल्या. कालांतराने त्यांना आपले स्वप्न सोडावे लागले आणि त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सीताफळ लागवडीचा (Cultivation of custardapple) निर्णय घेतला.

Havaman Andaj । मोठी बातमी! राज्याला पुन्हा बसणार अवकाळीचा फटका, शेतकऱ्यांवर अस्मानी संकट

विलास जाधव हे सुरुवातीला फक्त सोयाबीन,गहू हरभरा यांसारखी पिके घ्यायचे. परंतु, या पिकांमधुन त्यांना अपेक्षित उत्पन्न निघत नव्हते. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असल्यानेते निराश व्हायचे. परंतु त्यांनी हार न मानता सीताफळ लागवड करण्याच्या निर्णय घेतला. ते वाशीमच्या रिसोड तालुक्यातील घोनसर गावात राहतात. सीताफळ लागवडीतून (Custardapple Cultivation Information) त्यांनी समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

Leopards Attack । ऊसतोड कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर, बिबट्याच्या वावराने भीतीचे वातावरण

सरकारी अनुदानासह केली लागवड

या पिकाला जास्त पाण्याची गरज नसते. कमी पाण्यातही चांगले पीक येते. सरकारी योजनेचा (Government scheme) त्यांनी लाभ घेतला आहे. रोजगार हमी योजनेतुन त्यांना 1 लाख 35 हजार रुपयांचे अनुदान मिळाले आहे. यावर्षी त्यांचा पहिला तोडा झाला आहे. त्यातून त्यांना १ लाख रुपयाचं उत्पन्न मिळालं आहे. शिवाय आणखी दोन तोडे होणार असून त्यातून दोन लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना अपेक्षित आहे.

Crab farming । खेकड्याची शेती नेमकी कशी करावी? त्याच्या पद्धती कोणत्या? जाणून घ्या A to Z माहिती

दरम्यान, इतर शेतकऱ्यांना फळबाग लागवड करावी, असा सल्ला ते इतर शेतकऱ्यांना देत असतात. जर मनात जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतेच काम अशक्य नाही, हे विलास जाधव यांनी दाखवून दिले आहे. बाजारात सीताफळांना चांगली मागणी असते. हे फळ कमी पाण्यात येत असल्याने अनेकजण सीताफळाची लागवड करून चांगली कमाई करत आहेत.

Rain Gauge । राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत बसणार पाऊस मोजण्याचे यंत्र, कृषिमंत्र्यांनी दिली माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *