Success Story । अनेकजण शेतीतून नफा मिळत नाही असे म्हणतात. पण जर तुम्ही योग्य ते नियोजन केले तर तुम्हाला शेतीतून नोकरीपेक्षा जास्त कमाई करता येते. हल्ली शेतकरी आधुनिक शेती (Modern agriculture) करत आहेत. अशाच एका शेतकऱ्याने इंजिनीअरिंगच्या नोकरीला रामराम ठोकत टोमॅटोची शेती (Tomato farming) करण्याचा निर्णय घेतला. आज हा शेतकरी शेतीतून लाखोंचा नफा मिळवत आहे. कसे केले नियोजन जाणून घेऊयात.
Maize Crop । ऐकावे ते नवलंच! मक्याचं कणीस हिरवं पण त्यात दाणे काळे, कसं ते जाणून घ्या
सरकारी योजनेचा घेतला लाभ
राजेश रंजन (Rajesh Ranjan) असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. ते झारखंडमधील लोडीह या गावातील रहिवासी आहेत. विशेष म्हणजे त्यांनी इंजिनीअर झाल्यानंतर लागलेली नोकरी सोडून टोमॅटोची (Tomato) शेती करण्याचे ठरवले. त्यांनी दोन प्रकारचे टोमॅटो पिकवले आहेत. (Tomato cultivation) शेती करण्यासाठी त्यांनी सरकारी योजनेचा लाभ घेतला. ज्याचा त्यांना खूप फायदा झाला.
Havaman Andaj । राज्यातून थंडी गायब! ‘या’ ठिकाणी कोसळणार धो धो पाऊस, जाणून घ्या
राजेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी ते शहरातून परतले त्यावेळी त्यांना येथील शेतकरी खूप मेहनती असून येथील जमीन खूप सुपीक आहे असे समजले. या ठिकाणी केवळ आधुनिक तंत्रज्ञानाची आणि योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यांनी पंतप्रधान योजनेचा लाभ घेत एफपीओ स्थापन केला. यात त्यांना फलोत्पादन विभाग, पशुसंवर्धन विभाग आणि कृषी विभागाचे सहकार्य मिळाले.
Mango Pest । आंब्यांला बसला हवामानाचा मोठा फटका! फुलकिडीने शेतकरी हैराण
त्यांनी गावात पॉलीहाऊस बांधून त्यात टोमॅटोची लागवड केली. या पॉलीहाऊसमध्ये त्यांनी 600 टोमॅटोची रोपे लावली आहेत. ही झाडे 8 फूट ते 12 फूट उंचीची आहे. 250 ते 300 किलो टोमॅटोचे उत्पादन मिळते. सुरुवातीला त्यांनी पिकवलेल्या टोमॅटोची 60 रुपये किलोने विक्री झाली. पण सध्या टोमॅटोचे दर घसरले आहेत.
टोमॅटोच्या लावल्या दोन जाती
असे असतानाही त्यांना या हंगामात 80000 रुपयांची कमाई केली आहे. त्यांनी टोमॅटो आणि काकडीची लागवड केली असून पॉलीहाऊसमध्ये टोमॅटोच्या दोन जाती लावल्या आहेत. टोमॅटोमध्येही कलम होत असल्याने उत्पादन वाढल्याची माहिती शेतकऱ्याने दिली. जर तुम्हीही योग्य नियोजन केले तर तुम्हाला शेतीतून चांगली कमाई करता येईल.