Success Story

Success Story । वकिली पेशा सोडला अन् केली फुलशेती, आज होतेय 70 ते 75 लाख रुपयांची कमाई, असं केलं नियोजन

यशोगाथा

Success Story । इतरांसारखे आपल्याही मुलाने डॉक्टर, वकील, इंजनिअर बनाव, असं पूर्वी सर्वच पालकांना वाटतं असते. सध्या आपल्या मुलाला नेमकं काय बनायचंय हे अचूक ओळखून त्याच्या आवडीच्या क्षेत्रात त्याने प्रगती करावी, यासाठी पालक आपल्या मुलांना प्रोत्साहन देतात. हल्ली तरुणवर्ग नोकरीची वाट न धरता शेती (Flower farming) करू लागले आहेत. शिवाय शेतीत ते भरघोस कमाई करत आहेत.

Bee Attack । धक्कादायक! मधमाशांच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू तर दाेन जण जखमी

काही तरुण चांगला पगार असणारी नोकरी सोडून शेती करत आहेत. उत्तर प्रदेशमधील बाराबंकी जिल्ह्यातील देवा ब्लॉकमधील दफेदार पूर्वा येथील मोईनुद्दीन यांनी फुलशेती (Gladiolus farming) केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी वकिली सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला. २००२ साली त्यांनी वकिलीला रामराम ठोकत शेती (Gladiolus farming information) करण्यास सुरुवात केली. यात चांगला नफाही झाला आहे.

Havaman Andaj । मोठी बातमी! मिचॉन्ग चक्रीवादळामुळे ‘या’ राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याने दिला इशारा

केली ग्लॅडिओलस फुलांची शेती

त्यांनी ग्लॅडिओलस या फुलांची शेती (Gladiolus flower cultivation) केली. त्यात त्यांना लाखोंचा फायदा झाला. त्यांच्यापासून इतर शेतकऱ्यांनी प्रेरणा घेतली. या गावाला फुलांचे गाव म्हणून ओळखले जाते. मोईनुद्दीन यांनी उत्तर प्रदेशमध्ये पहिले पॉली हाऊस स्थापन करून त्यात जरबेराची लागवड केली. वकिली सोडून फुलशेती करुन लाखोंची कमाई करणारा हा शेतकरी संपूर्ण जिल्ह्याचा आदर्श बनला आहे.

Tur Market । शेतकऱ्यांना तुरीमुळे अच्छे दिन! नवीन तुरीला मिळणार ‘इतका’ भाव

त्यांनी लखनौमधून एलएलबी उत्तीर्ण केली. त्यानंतर त्यांना मोईनुद्दीनला कायद्याचा अभ्यास करावासा वाटला नाही, म्हणून त्यांनी बाराबंकीमध्ये फुलांची शेती करायला सुरुवात केली. सर्वात अगोदर त्यांनी एक बिघा शेतात विदेशी ग्लॅडिओलस फुलांची लागवड केली. एका बिघामध्ये 15 हजार ग्लॅडिओलस फुलांची लागवड करून चार ते पाच महिन्यांत 40 ते 45 हजारांचा त्यांना नफा झाला.

Cultivation of silk । रेशीम लागवडीसाठी मिळतंय पावणे दोन लाखांचं अनुदान, जाणून घ्या योजना

राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून गौरव

ग्लॅडिओलस फुलाचे एकदा रोप लावले की पाच ते सहा वर्षे फुले येतात. कोरोना काळात त्यांना खूप नुकसान सहन करावे लागले. त्यातून त्यांनी खचून न जाता पुन्हा मेहनत केली. मेट्रो शहरांमध्ये ग्लॅडिओलस फुले आणि जरबेरा (Gerbera) फुलांना चांगली मागणी आहे. फुलांच्या लागवडीतून त्यांची वार्षिक कमाई 70 ते 75 लाख रुपये इतकी आहे. इतकेच नाही तर देशाचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा गौरव केला आहे.

Agri startups । तरुणाचा नादच खुळा! 3 वर्षे शेतीत काबाडकष्ट केले अन् आता उभारली 1200 कोटींची कंपनी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *