Bee Attack

Bee Attack । धक्कादायक! मधमाशांच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू तर दाेन जण जखमी

बातम्या

Bee Attack । हल्ली मधमाशांचा हल्ल्याचे प्रमाण वाढत चालले आहे. यात अनेकांचा मृत्यू होती, तर काहीजण गंभीर जखमी होतात. मधमाशांनी अचानक केलेल्या हल्ल्यात अनेक शेतकरी (Bee Attack in Farmer) जागीच मृत्युमुखी पडतात. अशीच एक धक्कादायक घटना शेताकडे जात असणाऱ्या शेतकरी कुटुंबासोबत घडली आहे. मधमाशांच्या जीवघेण्या हल्ल्यात (Deadly bee attacks) एका शेतकऱ्याचा मृत्यू तर दाेन जण जखमी झाले आहेत.

Havaman Andaj । मोठी बातमी! मिचॉन्ग चक्रीवादळामुळे ‘या’ राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याने दिला इशारा

निलंगा तालुक्यातील ममदापूर येथे ही घटना घडली आहे. शेताकडे चाललेल्या एका १२ वर्षीय बालकावर मधमाश्यांनी (Bee Attacks) अचानक हल्ला केला. या मुलाच्या शेजारून जात असणारे शेतकरी विश्वभंर सिद्राम बिराजदार यांनी त्या मुलाचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु संतापलेल्या मधमाश्यांनी त्यांच्यावरही हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. हल्ल्यांनंतर त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल केले, परंतु दवाखान्यात जात असताना त्यांचा मृत्यू झाला.

Tur Market । शेतकऱ्यांना तुरीमुळे अच्छे दिन! नवीन तुरीला मिळणार ‘इतका’ भाव

मधमाश्यांचा जोरदार हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, विश्वभंर सिद्राम बिराजदार (वय ६५ वर्ष) शुक्रवारी सकाळी शेताकडे चालले हाेते. त्यावेळी वाटेत अचानक साेन्या अनंत म्हेत्रे (वय १२ वर्ष) या लहान बालकावर मधमाश्यांनी हल्ला केला. जीवाच्या आकांताने मुलगा वाचवा…वाचवा… असे ओरडत हाेता. त्याची हाक ऐकताच विश्वभंर बिराजदार हे त्याच्या मदतीला गेले. परंतु, मधमाश्यांनी त्यांचावर हल्ला केला.

Cultivation of silk । रेशीम लागवडीसाठी मिळतंय पावणे दोन लाखांचं अनुदान, जाणून घ्या योजना

जवळच शेतात काम करत असणारे त्या मुलाचे आजाेबाही त्यांच्या मदतीला धावत आले. परंतु मधमाश्यांनी त्यांच्यावरही हल्ला केला. या हल्ल्यात विश्वभंर बिराजदार हे गंभीर जखमी झाले. तातडीने त्यांनी आपल्या मुलाला फाेन करून हल्याची माहिती दिली. त्यानंतर त्यानं उपचारासाठी कासार बालकुंदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

Success story । गलेगठ्ठ पगारावर पट्ठ्याने मारली लाथ! वाटाणा शेती करून कमावले 5 कोटी; जाणून घ्या कस केलं नियोजन?

परंतु डाॅक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घाेषित केले. तसेच हल्ल्यात जखमी झालेल्यांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. माराेती जनार्धन बिराजदार यांनी दिलेल्या माहितीवरून कासार सिरसी पाेलिस ठाण्यात नाेंद केली आहे. सदर घटनेवरून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Agri startups । तरुणाचा नादच खुळा! 3 वर्षे शेतीत काबाडकष्ट केले अन् आता उभारली 1200 कोटींची कंपनी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *