Sugarcane workers

Sugarcane workers । ऊसतोड कामगारांबाबत सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय

बातम्या

Sugarcane workers । राज्यात सध्या उसाची तोडणी (Cutting sugarcane) सुरु आहे. ऊसतोड मजूर आपल्या मुलाबाळांसह दाखल झाले आहेत. दरम्यान, ऊसतोड मजुरांना देखील अनेक संकटांचा सामना करावा लागतो, अनेक अडचणी त्यांना येत असतात. (Sugarcane workers problems) अशावेळी ते सरकारकडे मदतीची विनंती करतात. अशातच आता सरकारने ऊसतोड कामगारांबाबत सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऊसतोड कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Papaya Rate । रक्ताचं पाणी करून बाग फुलवली मात्र तरीही शेतकऱ्याच्या पदरी निराशाच, पपईच्या उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ

सुरु केली जाणार 62 वसतिगृहे

दरम्यान, सामाजिक न्याय विभागाकडून गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ आणि भगवानबाबा सरकारी वसतिगृह योजनेतून ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी वसतिगृह (Hostel for childern of sugarcane workers) चालवण्यात येते. सध्या राज्यात 82 पैकी केवळ 20 वसतिगृहे (Hostel) सुरु आहेत. आता सरकारने 62 वसतिगृहे सुरू करण्यास मान्यता दिली आहे.

VR glasses | रशियात गायींना लावला जातो व्हीआर चष्मा, दूध उत्पादनात होते मोठी वाढ; वाचा सविस्तर माहिती

याबाबत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी माहिती दिली आहे. या योजनेंतर्गत राज्यात ऊसतोड कामगारांची संख्या जास्त असणाऱ्या 41 तालुक्यांची निवड केली आहे. या तालुक्यांमध्ये 100 क्षमतेचे मुला-मुलींसाठी स्वतंत्र असे एकूण 82 वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. सध्या बीड, अहमदनगर व जालना जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 20 वसतिगृहे भाडेतत्त्वावर सुरू केली आहे.

Abroad visit । आता शेतकऱ्यांनाही करता येणार परदेश दौरा, काय आहे सरकारची योजना? जाणून घ्या

यापैकी 5 वसतीगृहांना स्वतःच्या जागेत इमारत बांधकामासाठी आतापर्यंत प्रत्येकी 10 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. वसतिगृह योजनेतील उरलेली 62 वसतिगृहे सुरू केली जावीत, यासाठी मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार आता 31 तालुक्यात ही 62 वसतिगृहे उभारण्यात येणार आहे. सुरुवातीला ही वसतिगृहे भाडेतत्वावर जागा घेत चालवण्यात येणार आहे.

Crop Damage Compensation । ब्रेकिंग! ‘या’ जिल्ह्यात ६५ हजार शेतकऱ्यांना ९९ कोटींची मदत मंजूर

टप्प्याटप्प्याने सुरु होणार वसतिगृहे

आगामी शैक्षणिक वर्षांपासून ही वसतिगृहे ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी खुली केली जाणार आहे. टप्प्याटप्प्याने वसतिगृहे स्वतःच्या जागेत इमारती उभारून चालवण्यात येतील. ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी ऊसतोड कामगारांच्या मुलांची शाळेसह निवास आणि भोजनाची उत्तम सोय होण्यासाठी सरकारच्या या निर्णयाचा फायदा होईल.

Urea Fertilizer । शेतकऱ्यांनो सावधान! ‘या’ पिकासाठी चुकूनही वापरू नका युरिया, नाहीतर आर्थिक नुकसान झालेच समजा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *