Farming on AI

Farming on AI । काय सांगता! बारामतीत केली जातेय कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर शेती

तंत्रज्ञान

Farming on AI । अलीकडच्या काळात शेतीत अनेक बदल झाले आहेत. शेतीची जवळपास सर्वच कामे यंत्रांच्या मदतीने केली जाऊ लागली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची बचत होऊ लागली आहे. सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सची (Farming on Artificial Intelligence) सगळीकडे चर्चा होऊ लागली आहे. याच कारणावरून आता पुणे जिल्ह्यातील बारामती (Baramati) तालुका चर्चेत आला आहे.

Sugarcane workers । ऊसतोड कामगारांबाबत सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय

बारामतीत केला पहिला प्रयोग

बारामतीत आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर भारतातील पहिली शेती (Farming on AI in Baramati) केली आहे. येथे भेंडी, टोमॅटो, ऊस, मिरची, टरबूज, भोपळा, फ्लॉवर, कोबी ही या तंत्रज्ञानावर घेतली जात आहेत. याबाबत कृषी विज्ञान केंद्राचे तुषार जाधव यांनी माहिती दिली असून त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर प्रथमच शेतीमध्ये केली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून विविध पिके घेतली आहेत.

Papaya Rate । रक्ताचं पाणी करून बाग फुलवली मात्र तरीही शेतकऱ्याच्या पदरी निराशाच, पपईच्या उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ

इंटेलिजन्सच्या वापरामुळे जमिनीतील नत्र, स्फुरद, पालाश, हवेतील तापमान, हवेचा वेग आणि हवेतील आर्द्रता याची माहिती मिळते. पाण्याचे मोजमाप, जमिनीची क्षारता आणि पिकांवर परिणाम करणाऱ्या घटकांचा तपास करणारी यंत्रणा यात आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये सेन्सर्स असून ते अर्ध्या तासाला जमिनीतील आणि बाहेरील डाटा एकत्र करून सॅटॅलाइटला पाठवतात.

VR glasses | रशियात गायींना लावला जातो व्हीआर चष्मा, दूध उत्पादनात होते मोठी वाढ; वाचा सविस्तर माहिती

ही माहिती आपल्या संगणकाला मिळते. त्यानंतर पिकाला काय हवं आणि काय नको याचे माहिती शेतकऱ्याला मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना जमिन, खत आणि पाण्याचे नियोजन करता येते. वास्तविक, आर्टिफिशियल इन्टेलिजन्सची पायाभरणी तशी ७० वर्षांपूर्वी झाली आहे. मानवासारखी बुध्दिमत्ता प्राप्त करणे हे यामागचे उद्दिष्ट आहे.

Abroad visit । आता शेतकऱ्यांनाही करता येणार परदेश दौरा, काय आहे सरकारची योजना? जाणून घ्या

काय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स?

आर्टिफिशियल इन्टेलिजन्स म्हणजे यंत्राने मानवी मनासारखे विश्लेषण करणे, परिस्थितीनुरूप वर्तन करणे, तर्क करणे, शिकणे, समस्या सोडविणे, निर्मिती करणे होय. त्यातूनच रोबोट तयार होणार आहेत. ते आपल्या शेतात चालतील, त्यांना संगणकीय दृष्टी असेल, भाषा असेल, ते आपल्या इच्छेनुसार वागतील आणि परिस्थितीनुसार वर्तन करतील.

Crop Damage Compensation । ब्रेकिंग! ‘या’ जिल्ह्यात ६५ हजार शेतकऱ्यांना ९९ कोटींची मदत मंजूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *