Papaya Rate

Papaya Rate । रक्ताचं पाणी करून बाग फुलवली मात्र तरीही शेतकऱ्याच्या पदरी निराशाच, पपईच्या उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ

बाजारभाव

Papaya Rate । शेतकरी मानवनिर्मित तसेच नैसर्गिक समस्यांवर मात करत शेती करत असतात. काहीवेळा दिवसरात्र काबाडकष्ट करून शेतात जरी पीक आले तरी शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही. कारण अनेकवेळा शेतकऱ्यांना चांगला हमीभाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी निराश होतात. अनेकदा शेतकरी टोकाचा निर्णय घेतात. त्यामुळे शेतकऱ्याचे संपूर्ण नुकसान होते.

VR glasses | रशियात गायींना लावला जातो व्हीआर चष्मा, दूध उत्पादनात होते मोठी वाढ; वाचा सविस्तर माहिती

पपईच्या दरात घट

यंदा शेतकऱ्यांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. सुरुवातीला पावसाने पाठ फिरवली तर त्यानंतर शेतमालाचे दर कमी झाले. त्यामुळे शेतकरी अक्षरशः हतबल झाला आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका पपई (Papaya) उत्पादक शेतकऱ्यांना होत आहे. बाजारात पपईची आवक वाढल्याने दर कमालीचे घसरले (Papaya Rate Falls Down) आहेत. बाजारात आता पपई अवघ्या ३ ते ४ रुपये किलो प्रमाणे विक्री होत आहे. (Papaya price)

Abroad visit । आता शेतकऱ्यांनाही करता येणार परदेश दौरा, काय आहे सरकारची योजना? जाणून घ्या

अर्धापूर तालुक्यातील शेतकरी बाजारभाव नसल्याने पपईच्या बागावर नांगर फिरवत आहेत. लालबा जाधव हे जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील पांगरी गावात राहत असून त्यांनी हिवाळ्यात पपईला चांगला भाव मिळत असल्याने त्यांनी दीड एकरमध्ये पपई लागवड करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी दीड एकरमध्ये पपईच्या एक हजार रोपाची लागवड केली.

Crop Damage Compensation । ब्रेकिंग! ‘या’ जिल्ह्यात ६५ हजार शेतकऱ्यांना ९९ कोटींची मदत मंजूर

शेतकऱ्यांवर मोठे संकट

लागवडीसाठी त्यांना एकूण ७० हजार रुपये खर्च आला होता. त्यांना ६० ते ७० टन पपईची लागवड होईल आणि ६ ते ७ लाख रुपये उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा होती. दोन महिन्यांपूर्वी पपईला २० ते २५ रुपये प्रति किलो प्रमाणे भाव मिळत होता. आता पपईची ३ ते ४ रुपये प्रमाणे विक्री होतं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आता मोठे संकट निर्माण झाले आहे.

Urea Fertilizer । शेतकऱ्यांनो सावधान! ‘या’ पिकासाठी चुकूनही वापरू नका युरिया, नाहीतर आर्थिक नुकसान झालेच समजा

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपूर्वी अर्धापूर तालुक्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने थैमान घातले होते. यात इतर पीकसंसह पपईच्या बागेचे खूप नुकसान झाले होते. त्यावेळी पपईला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती. पण अचानक पपईच्या दरात मोठी घसरण झाली आहे. शेतकऱ्यांना आता लागवडीपासून ते काढणीचा निघत नाही.

Onion । ‘या’ तंत्रज्ञानामुळे साठवणूक केलेला कांदा कधीच सडणार नाही, कसे ते जाणून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *