Soybean Rate

Soybean Rate । सोयाबीनच्या दरात मोठी घसरण; वाचा किती मिळतोय दर?

बाजारभाव

Soybean Rate । सोयाबीनला चांगला दर मिळेल या आशेने यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड केली होती. काही शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवणूक करून देखील ठेवला होता. मात्र सोयाबीनचे दर घसरल्याचे पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभा राहिले आहे. हमीभावापेक्षा दोनशे रुपये कमीने सोयाबीनची विक्री सुरू आहे. सरकारचे धोरण आणि जागतिक बाजारपेठेचा सोयाबीनच्या दरावर परिणाम झालेला दिसत आहे.

White Strawberries । शेतकऱ्याची बातच न्यारी! लाल नाहीतर पांढऱ्या स्ट्रॉबेरीची केली शेती; लाखोंचे उत्पन्न

केंद्र सरकारचे खाद्यतेल आयातीचे धोरण त्याचबरोबर जागतिक पातळीवर सोयाबीनचे भरघोस उत्पादन याचा थेट परिणाम राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भोगाव लागत आहे. शेतकऱ्यांच्या सोयाबीनला खूप कमी भाव मिळत आहे. यामुळे झालेला खर्च देखील निघणे मुश्किल झाले आहे. हमीभावापेक्षा सोयाबीनचे दर कमी झाल्याने शेतकरी व्यापारी आणि उद्योजकांसमोर मोठा आता प्रश्न निर्माण झाला आहे. येणाऱ्या काळातही सोयाबीनचे दर वाढण्याची चिन्हे दिसत नाहीत.

Top 5 Varieties of Ladyfinger । भेंडीच्या या ५ जाती शेतकऱ्यांना जास्त नफा मिळवून देखील; जाणून घ्या कोणत्या त्या?

लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती प्रभारी सचिव भास्कर शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारपासून सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा कमी झाले आहेत. सोयाबीनचे दर जर असेच कमी राहिले तर त्याचा अवकीवर देखील परिणाम होणार असल्याचे त्यांनी सांगितले”.

Cabinet Dicision । मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी घेण्यात आला धडाकेबाज निर्णय; होणार मोठा फायदा

शेतकरी मोठ्या चिंतेत

सोयाबीनकडे नगदी पीक म्हणून पाहिले जाते. राज्यभर अनेक शेतकरी सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. सोयाबीनला योग्य भाव आल्यानंतर शेतकरी सोयाबीनची विक्री करतात मात्र यावर्षी सातत्याने सोयाबीनच्या दरामध्ये घसरणच होत आहे. यामुळे अनेक दिवस सांभाळलेला सोयाबीन पुन्हा सांभाळायची वेळ येणार का? असा प्रश्न सर्वसामान्य सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे.

Sugarcane Cultivation । AI टेक्नॉलॉजीने होणार ऊस लागवड, शेतकऱ्यांना मिळणार अनेक मोठ्या समस्यांवर काही मिनिटांत उपाय

सोयाबीनचे घसरलेले दर पाहता शेतकऱ्यांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही सरकारला फक्त आमच्या मेहनतीचा दर मागत आहोत सरकार फक्त बोलत आहे मात्र कृती कोणतीही करत नाही. भाव पडल्याने आडती वरचा सोयाबीन घरी घेऊन यावा लागतोय अशी माहिती काही शेतकऱ्यांनी दिली आहे.

Animal Husbandry । जनावरांमध्ये लाळ्या खुरकूत रोग कसा होतो? वाचा महत्वाची माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *