Cabinet Dicision

Cabinet Dicision । मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी घेण्यात आला धडाकेबाज निर्णय; होणार मोठा फायदा

बातम्या

Cabinet Dicision । काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सर्वसामान्यांसाठी तब्बल २० निर्णय घेण्यात आले. त्याचबरोबर शेतकरी आणि वयोवृद्धांसाठीदेखील महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या मंत्रिमंडळ बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते.

Sugarcane Cultivation । AI टेक्नॉलॉजीने होणार ऊस लागवड, शेतकऱ्यांना मिळणार अनेक मोठ्या समस्यांवर काही मिनिटांत उपाय

बांबू लागवडीसाठी मोठा निर्णय

बांबू लागवड हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. राज्यभरातील अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बांबूची लागवड करावी. असे आव्हान नेहमीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत. आता यासाठी राज्य सरकारकडून प्रोत्साहन देखील दिले जाणार आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

wheat crop । गहू पिकासाठी झिंक अत्यंत आवश्यक, जमिनीत त्याची कमतरता असल्यास हे उपाय करा; उत्पादनात होईल वाढ

त्याचबरोबर सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात मधुमक्षिका पालन व्यवसाय विस्तारत आहे. या व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यभरात ‘मधाचे गाव योजना’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन्ही निर्णयांचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

Swabhimani Shetkari Sangathan । धक्कादायक! स्वाभिमानीच्या जिल्हाध्यक्षाचा तुफान राडा, चार ते पाच जणांना गंभीर दुखापत

मंत्रिमंडळ बैठकीतील अन्य महत्त्वाचे निर्णय

१) मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून 65 वर्षावरील नागरिकांना लाभ देणार.

२) राज्यात नमो महारोजगार मेळावे आयोजित करणार. 2 लाख रोजगार, स्वयंरोजगार निर्माण करणार.

३) उत्पन्नवाढीसाठी शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी अनुदान देणार.

४) राज्यातील सर्व पालिकांमध्ये नगरोत्थान महाभियान राबवणार.

५) शिर्डी विमानतळाचा अधिक विस्तार, नवीन इमारत उभारणी.

६) धारावी पुनर्वसनासाठी केंद्राची मिठागर जागा मागणार.

७) सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते.

८) स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन सांगोला प्रकल्पास सुधारित मान्यता.

९) बिगर कृषी सहकारी संस्थांना अर्थसहाय्य. पतसंस्थांना मजबूत करणार.

१०) कोंढाणे लघु प्रकलपाच्या कामास जादा खर्चास मान्यता.

११) तिवसे लघु पाटबंधारे योजनेची पुनर्स्थापना करणार.

१२) नांदेडच्या गुरुद्धारासाठी तख्त सचखंड श्री हजूद सादिब गुरुद्धारा अधिनियम.

१३) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्रतिमा उंचावण्यासाठी जनसंपर्क अधिकारी नेमणार.

१४) कृषी विद्यापीठातील शिक्षकांच्या सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष.

१५) सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक बांधकामचे नवीन मंडळ कार्यालय.

१६) गोसेवा आयोगासाठी सहआयुक्त पशुसंवर्धन पद.

१७) पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी जुन्नर तालुक्यात बिबट सफारी.

१८) मध उद्योगाला मिळणार बळकटी.

१९) बंजारा, लमाण समाजाच्या तांड्यांचा विकास करणार. त्यांना मूलभूत सुविधा देणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *