Swabhimani Shetkari Sangathan । शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना सतत सरकारविरोधात आवाज उठवत असते. शेतकऱ्यांसाठी ही संघटना ठिकठिकाणी आंदोलन देखील करताना आपल्याला पाहायला मिळते. अशातच आता एक धक्कादायक बाब समोर आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षाने तुफान राडा केला आहे.
जिल्हाध्यक्षाने केला तुफान राडा
यामध्ये चार ते पाच जणांना गंभीर दुखापत झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोनगावात ही घटना घडली आहे. यामुळे पोलिसांनी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर टाले यांच्यासह १० ते १२ जनांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. जखमींना मेहकर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
जुन्या वादातुन केला हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाण्यातील डोनगाव येथील जागेच्या जुन्या वादातुन दोन गटात तुफान हाणामारी झाली. याचे कारण हे गजानन सातपुते यांच्या ताब्यात असणारे दुकान आहे, असे बोलले जात आहे. या दुकानाचा ताबा घेण्यासाठी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर टाले यांच्यासह १० ते १२ जणांनी बळजबरीने दुकानात प्रवेश केला आणि यावेळी हा तुफान राडा झाला.
इतकेच नाही तर यावेळी तेथे असणाऱ्या महिलांना सुद्धा मारहाण झाल्याचेही समोर आले आहे.धक्कादायक बाब म्हणजे हल्ला करताना कोयत्याचा वापर केला होता. त्यामुळे या हल्ल्यात ज्ञानेश्वर टाले यांच्यासह इतर चार ते पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. याची डोनगाव पोलिसांत नोंद झाली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.
याप्रकरणी डोनगाव पोलिसांकडून ज्ञानेश्वर टाले, वैभव आखाडे, देवेंद्र आखाडे यांच्यासह पाच जणांवर गुन्हे नोंद दाखल करण्यात आले आहेत. तर ज्ञानेश्वर टाले यांनी उलट तक्रार दाखल केली आहे. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.