Amul Dairy

Amul Dairy । 36 लाख शेतकऱ्यांशी नाळ जोडलेल्या अमूल डेअरीची 50 वर्ष पूर्ण, जाणून घ्या सविस्तर

बातम्या

Amul Dairy । दूध (Milk) आपल्या आहारातील सर्वात मोठा भाग आहे. दुधात मोठ्या प्रमाणात कॅल्शिअम असल्याने डॉक्टर लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांना दूध पिण्याचा सल्ला देतात. (Benefits of Milk) काहीजण दूध डेअरीमधून दूध विकत घेतात. अमूल (Amul) ही देशातील आघाडीची दूध उत्पादक सहकारी संस्था आहे. तिच्या ग्राहकांची संख्या देखील खूप मोठी आहे.

Crop Damage । मोठी बातमी! ‘या’ शेतकऱ्यांसाठी सरकारकडून 107 कोटींचा निधी मंजूर, जाणून घ्या संपूर्ण माहिती

जोडली 36 लाख शेतकऱ्यांशी नाळ

अशातच आता या डेअरीला (Amul Milk Institute) तब्बल 50 वर्ष पूर्ण झाली आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अमूल डेअरीची (Amul Milk) 36 लाख शेतकऱ्यांशी नाळ जोडली आहे. ही संस्था दररोज अमूलकडून 3.5 कोटी लिटर दूध संकलित करते. संस्था शेतकऱ्यांना दररोज 200 कोटी रुपये त्यांच्या दुधासाठी वाटप करते. अमूल दूध संस्थेच्या दूध उत्पादनात मागील दशकभरात 60 टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे.

Animals Subsidy Scheme । आता बिनधास्त पाळा घोडे, गाढव; सरकार देतंय 50 लाखांपर्यंतचं अनुदान

दरम्यान, अमूलला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अहमदाबाद येथे नरेंद्र मोदी (Narendra Modi) स्टेडियमवर आज ‘या संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितीत लावत देशातल्या अनेक भागांमध्ये पसरलेलया आणि जवळपास 18,600 गावांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अमूल दूध उत्पादक संस्थेचे तोंड भरून कौतुक केले आहे. 36 लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांसोबत जोडलेल्या या संस्थेला नरेंद्र मोदी यांनी ‘वटवृक्ष’ अशा शब्दात उपाधी दिली.

Success Story । युवा शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग! एक हेक्टर भाजीपाल्यातून होतेय लाखोंची कमाई

पुढे नरेंद्र मोदी म्हणाले की, देशातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी 50 वर्षांपूर्वी ‘अमूल’च्या रूपात एका वडाच्या झाडाचे रोपटे लावले होते. जे रोपटे आज महाकाय वडाच्या झाडामध्ये रूपांतरित झाले असून यात दूध उत्पादक शेतकऱ्यांचे खूप मोठे योगदान आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर अनेक दूध उत्पादक संस्था नावारूपाला आल्या. अमूलसारखे यश कोणत्याही संस्थेला मिळवता आलेले नाही. या कार्यक्रमाला देशातील अमूलच्या 18,600 गावांमधील प्रतिनिधींनी हजेरी लावली.

Agriculture News । शेताच्या बांधावर कोणती झाडे लावावीत? जाणून घ्या तज्ञांचं मत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *