Crop Damage

Crop Damage । मोठी बातमी! ‘या’ शेतकऱ्यांसाठी सरकारकडून 107 कोटींचा निधी मंजूर, जाणून घ्या संपूर्ण माहिती

बातम्या

Crop Damage । दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. त्यात शेतकऱ्यांना अवकाळी, अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ यांसारख्या संकटांमुळे दरवर्षी अपेक्षित असे उत्पन्न मिळत नाही. यंदा अवकाळी पावसाने (Heavy rain) हजारो हेक्टरवर असणारी शेतीचे नुकसान केले आहे.

Animals Subsidy Scheme । आता बिनधास्त पाळा घोडे, गाढव; सरकार देतंय 50 लाखांपर्यंतचं अनुदान

सरकारकडून 107 कोटींचा निधी मंजूर

दरम्यान, राज्यात 2020 ते 2022 या कालावधीत विविध नैसर्गिक आपत्तीमुळे पुणे, कोकण, नागपूर, नाशिक, अमरावती आणि संभाजीनगर या विभागांमध्ये शेती पिकांचे खूप मोठे नुकसान झालेले होते. त्यावेळी संबंधित विभागांच्या विभागीय आयुक्तांकडून मदत निधीच्या मागणीसाठीचे पत्र सादर केले होते. या पार्श्वभूमीवर या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 106 कोटी 64 लाख 94 हजार रुपयांचा निधी वितरित केला जाणार आहे.

Success Story । युवा शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग! एक हेक्टर भाजीपाल्यातून होतेय लाखोंची कमाई

याबाबतच जीआर राज्य सरकारने जारी (State Govt GR) केला आहे. 2019 मध्ये कोरोना काळातील 2-3 वर्षांमध्ये नैसर्गिक आपत्तीच्या काळात या निधीची मागणी केली होती. पण काही कारणामुळे सरकारकडून या मदत निधीच्या प्रस्तावावर कारवाई झाली नव्हती. त्यामुळे राज्य सरकारकडून कोरोना काळातील नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या नुकसानीबाबत आवश्यक मदतीचे प्रस्ताव नव्याने पाठवण्याचे आदेश विभागीय आयुक्तांना दिले होते.

Agriculture News । शेताच्या बांधावर कोणती झाडे लावावीत? जाणून घ्या तज्ञांचं मत

यानुसार प्राप्त आदेशानुसार कोरोना काळात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांच्या आणि इतर बाबींच्या नुकसानीपोटी हा निधी राज्य सरकारकडून मंजूर केला आहे. वर्ष 2020 ते 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतीपिकांच्या मदतीबाबत त्या-त्या भागातील लोकप्रतिनिधी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून वारंवार मागणी केली जात होती. आता याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. त्यामुळे कोरोना काळात विविध नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Central Govt । ब्रेकिंग! केंद्र सरकारचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय; शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *