Success Story

Success Story । युवा शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग! एक हेक्टर भाजीपाल्यातून होतेय लाखोंची कमाई

यशोगाथा

Success Story । भारतात मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. भारताच्या अर्थव्यवस्थेत शेतीचा मोठा वाटा आहे. अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाह शेती आणि शेतीशी आधारित उद्योगधंद्यांवर अवलंबून आहे. हल्ली शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती (Modern Farming) करत आहेत. ज्यातून त्यांना खूप फायदा होत आहे. जास्त नफा मिळत असल्याने हल्ली तरुणवर्ग देखील शेती करत आहेत.

Agriculture News । शेताच्या बांधावर कोणती झाडे लावावीत? जाणून घ्या तज्ञांचं मत

अशाच एका युवा शेतकऱ्याने भाजीपाला पिकाचा यशस्वी प्रयोग करून दाखवला आहे. बिहारमधील एका शेतकऱ्याने भाजीपाल्याच्या शेतीतून (Vegetable farming) आपली आर्थिक प्रगती केली आहे. या भाजीपाला पिकातून या शेतकऱ्याने लाखो रुपये कमावले आहेत. आशुतोष पांडे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. आशुतोष पांडे (Ashutosh Pande) हे आपल्या शेतात विविध भाजीपाला पिकवतात

Central Govt । ब्रेकिंग! केंद्र सरकारचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय; शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

एक हेक्टरमधून लाखोंची कमाई

या भाजीपाल्याच्या मदतीने ते वर्षभर उत्पादन मिळवतात. आशुतोष पांडे हे आपल्या शेतातून बटाटे, चवळी, सोयाबीन, शिमला मिरची आणि धणे या पिकांच्या उत्पादनातून भरघोस नफा मिळवत आहे. या पिकांचे उत्पादन ऑफ-सीझन मार्केटला टॅप करण्याच्या उद्देशाने केले आहे. आशुतोष पांडे यांनी एका हेक्टरमध्ये तब्बल 8 लाख रुपयांचा नफा मिळवला आहे.

Baramati News । बारामतीच्या मानपेचात मानाचा तुरा! सातासमुद्रापार निर्यात होणार केळी आणि पेरू, अपेडाने घेतला पुढाकार

आशुतोष पांडे यांनी स्ट्रॉबेरीचे (Strawberry cultivation) चांगल उत्पन्न मिळवलं आहे. स्ट्रॉबेरीची 100 ते 200 रुपये दराने विक्री करण्यात येते. लागवडीचा विचार केला तर त्यांनी बटाटे आणि सोयाबीनची लागवड रुंद वाफ्यात केली आहे. प्रत्येक बेडवर दोन ओळी बटाटे आणि बीन्स लावले असून बटाट्याचे 140 क्विंटल उत्पादन घेतले आहे. तसेच त्यांनी शेतात कोथिंबिरीचे उत्पादन घेतलं आहे.

Irrigation Department । मोठी बातमी! पोटवितरिका फोडून पाणी सोडल्याने पवारांवर गुन्हा दाखल

हॉटेल्स आणि स्थानिक बाजारपेठेत मागणी

सोयाबीन, बटाटे, चवळी यासारख्या उच्च किमतीच्या पिकांच्या उत्पादनांना हॉटेल्स आणि स्थानिक बाजारपेठेत चांगली मागणी आहे. स्ट्रॉबेरीची लागवड जास्त फायदेशीर ठरत असल्याने ग्रामीण भागातील युवावर्ग मोठ्या प्रमाणात शेतीकडे वळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे.

Gram Rate । नवा हरभरा खातोय ‘इतका’ भाव, जाणून घ्या नवीनतम दर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *