Agriculture News । भारतात मोठ्या प्रमाणावर शेती (Agriculture) केली जाते. भारताच्या अर्थव्यवस्थेत (Economy of India) शेतीचा मोठा वाटा आहे. अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाह शेती आणि शेतीशी आधारित उद्योगधंद्यांवर अवलंबून आहे. पण अनेक शेतकरी टोकाचा निर्णय घेतात, कारण दरवर्षी पिकाला योग्य हमीभाव मिळतोच असे नाही. अशावेळी कृषी तज्ञ शेतकऱ्यांना काही सल्ला देतात.
शेताच्या बांधावर लावा ही झाडे
शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती केली तर त्याचा फायदा होतो. शेतकरी आता कमी जमिनीत जास्त उत्पन्न मिळवू शकतात. यासाठी त्यांना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. जर शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावर (Farm embankment) जर फळझाडे, औषधी वनस्पती, किंवा इतर वन झाडांची लागवड केल्यास शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पादन मिळेल. तसेच त्यांना झाडांपासून लाकूड, फळे,चारा, औषध इत्यादी मिळणार आहे.
हिरवा चारा हवा असल्यास सुबाभूळ, अंजन, शिवण, खैर, नीम, पांगारा, शेवरी, पळस, आपटा, कांचन, हादगा, बाभूळ या झाडांची लागवड करता येते. जर जळणासाठी लाकूड हवे असल्यास तुम्ही निलगिरी, बाभूळ, करंज, हादगा, सुरू, पळस, शेवरी इत्यादी झाडांची लागवड करू शकता. तुम्हाला फळझाडांची लागवड करायची असल्यास तुम्ही तुमच्या शेताच्या बांधावर आंबा, आवळा, बोर, जांभूळ, पेरू, सीताफळ, चिंच अशा इत्यादी फळझाडांची लागवड करू शकता.
Irrigation Department । मोठी बातमी! पोटवितरिका फोडून पाणी सोडल्याने पवारांवर गुन्हा दाखल
इतकेच नाही तर तुम्ही साग, नीम, बाभूळ, करंज, सुरू, काशीद अशा झाडांची लागवड करू शकता. जैविक इंधनाकरिता म्हणजे इथेनॉल निर्मितीमध्ये उपयोगी येणाऱ्या झाडांची तुम्ही बांधावर लागवड केली तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. यात वन एरंड, महुआ, करंज, जोजोबा, सीमारुबा या झाडांचा समावेश होतो. याची लागवड केली तर तुम्हाला दुहेरी उत्पन्न मिळेल.
Gram Rate । नवा हरभरा खातोय ‘इतका’ भाव, जाणून घ्या नवीनतम दर