Agriculture News

Agriculture News । शेतकऱ्यांनो, करा ‘या’ औषधी वनस्पतीची शेती, तीन महिन्यात मिळतील तीन लाख रुपये

कृषी सल्ला

Agriculture News । अनेकांना शेती परवडत नाही, असे वाटते. परंतु जर तुम्ही मेहनत आणि आधुनिक पिकांची लागवड केली केली तर तुम्हाला शेतीमधून फायदा होऊ शकतो. अनेक शेतकऱ्यांना आधुनिक शेतीतून खूप फायदा होत आहे. शेतकरी आता औषधी वनस्पतीची शेती करत आहे. अनेकांना वेगळे काहीतरी करण्याची इच्छा असते. तर तुम्हीही औषधी वनस्पतीची शेती करू शकता.

Animal Husbandry । बापरे! तब्बल 11 कोटींची म्हैस, महिन्याला येतोय अडीच ते तीन लाखांचा खर्च

महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला या औषधी वनस्पतीची शेती करण्यासाठी जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. तुम्ही कमी किमतीत ही शेती करू शकता. अवघ्या 15 हजार रुपयांत शेती (Tulsi Cultivation) करू शकता. तुम्हाला तुळशीची शेती (Cultivation of Tulsi) करता येईल. यासाठी तुम्हाला जास्त जमिनीची गरज नाही. तुम्हाला कमी जागेत शेती करून चांगले पैसे मिळवता येतील. वैद्यनाथ डाबर, पतंजली आणि आयुर्वेदिक औषधे बनवणाऱ्या कंपन्यांसोबत कॉन्ट्रॅक्ट करता येईल.

Cotton Rate । कापूस उत्पादकांना अच्छे दिन! कापसाचे दर ८ हजारांवर

अशी करा लागवड

या कंपन्या स्वतः वनस्पतीची (Tulsi Cultivation Information) खरेदी करतात. सध्या बाजारात तुळशीच्या बिया आणि त्यापासून बनणाऱ्या तेलासाठी खूप मागणी आहे. तुळशीच्या बिया आणि त्यापासून बनणाऱ्या तेलाला बाजारात मोठी मागणी आहे. तुळशीची शेती करण्यासाठी वालुकामय चिकणमाती योग्य आहे. जून-जुलै महिन्यामध्ये तुळशीच्या बियांद्वारे रोपे तयार केली जातात. पुढे त्यापासून रोपे तयार करतात.

Agriculture Electricity । वीज कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट! रब्बी हंगाम धोक्यात

लागवड करत असताना दोन ओळींमध्ये 60 सें.मी. आणि दोन रोपामध्ये 30 सें.मी. अंतर असावे. 100 दिवसांच्या कालावधीत रोपे तयार होतात. 100 दिवसांनंतर काढणी प्रक्रिया सुरू होते. महत्त्वाचे म्हणजे तुळशीचे अनेक प्रकार आहेत. या शेतीने अनेक शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळवून दिला आहे. तीन महिन्यात तुम्ही तीन लाख रुपये कमावू शकता. देशात अशा अनेक औषधी वनस्पती आहेत, ज्यांचा वापर आजारांवर केला जातो.

Drought in Maharashtra । अर्रर्र! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार ‘इतकीच’ मदत, राहावे लागणार आर्थिक मदतीपासून वंचित

प्रशिक्षण गरजेचे

हे लक्षात घ्या की औषधी वनस्पतीच्या लागवडीसाठी, योग्य प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. ज्यामुळे तुमची कोणतीही फसवणूक होणार नाही. लखनौस्थित सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल अँड अॅरोमेटिक प्लांट (CIMAP) या वनस्पतींच्या लागवडीसाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे. या संस्थेच्या माध्यमातून तुम्ही फार्मास्युटिकल कंपन्याशी करार करू शकता.

Milk Price । दूध दरावरून शेतकरी अडचणीत! जनावरांची कवडीमोल भावात विक्री, पावसाअभावी चाऱ्याचीही टंचाई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *