Milk Price

Milk Price । दूध दरावरून शेतकरी अडचणीत! जनावरांची कवडीमोल भावात विक्री, पावसाअभावी चाऱ्याचीही टंचाई

पशुसंवर्धन

Milk Price । मागील काही दिवसांपासून दुधाचे दर खूप कमी (Milk Price Falls Down) झाले आहेत. पशूंच्या चाऱ्याच्या किमती खूप वाढल्या आहेत. चाऱ्याच्या किमती वाढल्याने पशुपालक आर्थिक संकटात आले आहेत.एकंदरीतच पशुपालनाचा व्यवसाय तोट्यात आला आहे. जर हे दर असेच घसरत चालले तर पुन्हा एकदा राज्याचे वातावरण तापू शकते. सणासुदीच्या काळात देखील दर कमी झाले होते. त्यामुळे पशुपालक वर्ग अडचणीत आला आहे.

Gauri Sugar Hirdgaon Factory । गौरी शुगर हिरडगाव कारखान्याचा पहिला हप्ता 3 हजार 106 रुपये; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

मधील पाच-सहा महिन्यांपूर्वी गाईच्या दुधाचे दर ३८ रुपये झाले होते. ते आता थेट २७ रुपयांपर्यंत (Milk Price Falls) खाली आले आहे. महत्त्वाचे म्हणजे काही ठिकाणी २६ रुपये दर पाहायला मिळत आहे. यंदा देशातील अनेक राज्यात पाऊस कमी प्रमाणात झाला आहे. त्यामुळे पशुखाद्याचे दर खूप वाढले आहेत. पशुपालकांना चारा जास्त किमतीने विकत घ्यावा लागत आहे. दुधाच्या किमती कमी आणि चारा महाग झाल्याने पशुपालकांचं गणित बिघडलं आहे.

Havaman Andaj । सावधान! या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

अशातच आता पशुपालकांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. दुधाळ जनावरांच्या किमती प्रचंड (Animal Price) घसरल्या आहेत. बाजारात जनावरांची आवक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. परंतु तुलनेने खरेदीदार बाजाराकडे पाठ फिरवत आहेत. नाइलाजाने पशुपालक आता कवडीमोल किंमतीत जनावरांची खरेदी आणि विक्री करत आहे. दुधाच्या किमती कमी आणि चाऱ्याच्या किमती महागल्याने पशुपालक अडचणीत आले होते. अशातच आता जनावरांच्या किमतीही कमी झाल्या आहेत.

Varieties of Wheat । शेतकऱ्यांनो, गव्हाची पेरणी करताय तर या प्रमुख जातींची करा पेरणी; हेक्टरी ७६ क्विंटल उत्पादन मिळेल

पशुसंवर्धन विभागाचे दुर्लक्ष

पशुपालक कमालीचे नाराज झाले आहेत. हे दर पूर्वीप्रमाणे कमी करण्यात आले आहेत. पशुसंवर्धनमंत्र्यासह सगळेच नेते याकडे लक्ष देत नाही. एकंदरीतच सरकारने नेमलेल्या समितीसह पशुसंवर्धन विभागदेखील याकडे दुर्लक्ष करत आहेत. पशुपालनाचा व्यवसाय पुन्हा एकदा धोक्यात आला असून आता याकडे सरकार कितपत लक्ष देते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Saffron Farming । काश्मीरच्या खोऱ्यातील केशर महाराष्ट्रात कसा वाढला? अभियांत्रिकीचा विद्यार्थी करतोय शेती; जाणून घ्या कसं केलय नियोजन?

सरकारने नेमली समिती

काही दिवसांपूर्वी सरकारकडून गाईच्या दुधाचे दर निश्चित करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती. या समितीने अभ्यास करून गाईच्या दुधाला कमीत कमी ३४ रुपये दर देण्याचे निश्चित केले होते. यानुसार दूध संघांनी देखील २१ जुलैपासून ३.५ फॅट आणि ८.५ एसएनएपला ३४ रुपये दर द्यायची घोषणा केली होती. परंतु रिटर्नचे दर वाढवून एसएनएफच्या प्रतिपॉईंटला ३० पैशाऐवजी १ रुपये व फॅटच्या प्रतिपॉईटला २० पैशांऐवजी ५० पैसे कपात सुरु केली.

Onion Rate । अमेरिकेत कांदा प्रति किलो किती आहे? तिथले दर ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *