Cotton Rate । मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाच्या दरात कमालीची घट पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी दर कमी झाल्याने काही शेतकऱ्यांनी कापसाची विक्री न करता कापूस घरातच ठेवण्याचा निर्णय घेतला. अशातच आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता कापूस उत्पादकांना (Cotton Price) अच्छे दिन आले आहेत.
Agriculture Electricity । वीज कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट! रब्बी हंगाम धोक्यात
कापसाचे वाढले दर
कापसाला दिवाळीपूर्वी सात हजार रूपये प्रतिक्विंटल दर होता. दिवाळीनंतर आठ हजारांवर पोहोचला (Cotton Price Hike) आहे. कापसाला अकोट बाजारपेठेमध्ये प्रतिक्विंटल 7 हजार 825 रूपये दर मिळाला असून कापूस उत्पादकांमध्ये आनंदाचे वातारवण निर्माण झाले आहे. दरम्यान, भाववाढीच्या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कापूस राखून ठेवला होता, आता कापूस आठ हजारांवर गेल्याने भाववाढीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सरकीचे दर
मागील वर्षीच्या तुलनेत खुल्या बाजारातील या वर्षी कापसाचे दर कमी झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे कापसाचे दर रूई आणि सरकीच्या दरावर अवलंबून असतात. मागील वर्षी सरकीचे दर 4 हजार 200 रूपये क्विंटल होते. तर सरकी यावर्षी 3 हजार 300 ते 3 हजार 500 रूपये प्रतिक्विंटल पर्यंत खाली आली आहे. पावसामुळे कापसाचे उत्पादन कमी झाले आहेत.
Milk Price । दूध दरावरून शेतकरी अडचणीत! जनावरांची कवडीमोल भावात विक्री, पावसाअभावी चाऱ्याचीही टंचाई
काही दिवसांपूर्वी कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने पहिल्या पीक अंदाजात 2023-24 मध्ये कापूस उत्पादन 295.10 लाख गाठी होतील, असे म्हटले होते . जो मागील 15 वर्षातील सर्वात कमी आहे. महत्त्वाचे म्हणजे एका गुठळ्याचे वजन 170 किलो इतके असते. 2023-24 चा अंदाज मागील वर्षीच्या 318.90 लाख गाठींपेक्षा 7.5 टक्क्यांनी कमी आहे. एल निनोचा परिणाम आणि कापूस क्षेत्रात 5.5 टक्के घट झाल्यामुळे उत्पादनात देखील घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.
कापसाच्या निर्यातीत घसरण
दरम्यान, कापूस हे पांढरं सोनं मानलं जातं. विदर्भामध्ये कापसाचं सर्वाधिक उत्पादन घेतलं जातं आणि नंतर मराठवाड्याचा क्रमांक लागतो. कापूस हे खरिपातील महत्त्वाचं पीक आहे. निसर्गाचा लहरीपणा आणि प्रमाणापेक्षा जास्त पावसामुळे कापसाच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होतो. तब्बल 18 वर्षानंतर कापसाच्या निर्यातीत कमालीची घसरण (Cotton exports) झाली आहे.
Havaman Andaj । सावधान! या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता