Animal Husbandry

Animal Husbandry । बापरे! तब्बल 11 कोटींची म्हैस, महिन्याला येतोय अडीच ते तीन लाखांचा खर्च

पशुसंवर्धन

Animal Husbandry । सध्या मोठ्या प्रमाणात पशुपालन केले जात आहे. शेतीसोबत केलेल्या या व्यवसायामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. जर तुम्हाला या व्यवसायात जास्त नफा मिळवायचा असेल तर तुम्हाला जास्त दूध देणाऱ्या जनावरांची निवड करावी लागेल. तसेच त्यांच्या आहाराची आणि आरोग्याचीही तुम्हाला जास्त काळजी घ्यावी लागेल.

Agriculture Electricity । वीज कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट! रब्बी हंगाम धोक्यात

सध्या एका म्हशीची चांगलीच चर्चा होत आहे. यामागचं कारण म्हणजे त्या म्हशीची असणारी किंमत. म्हशीची किंमत जाणून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. सध्या राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यातील पुष्कर येथे एक आंतरराष्ट्रीय पुष्कर मेळा (Pushkar Mela) भरला आहे. या मेळ्यामध्ये एका म्हशीने (Anmol buffalo) सर्वाचं लक्ष वेधून घेतले आहे.

Drought in Maharashtra । अर्रर्र! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार ‘इतकीच’ मदत, राहावे लागणार आर्थिक मदतीपासून वंचित

किती आहे किंमत?

किमतीचा (Anmol buffalo price) विचार केला तर या म्हशीची किंमत 11 कोटी रुपये इतकी आहे. हरविंदर सिंह असे या म्हशीच्या मालकाचे नाव आहे. आतापर्यंत 8 वर्षांच्या अनमोलने प्रजननातून 150 पिल्लांना जन्म दिला असून ती मुर्राह जातीची आहे. 5.8 फूट उंच आणि तब्बल 1570 किलो वजन आहे. मागील वर्षी त्याचे वजन 1400 किलो इतके होते.

Milk Price । दूध दरावरून शेतकरी अडचणीत! जनावरांची कवडीमोल भावात विक्री, पावसाअभावी चाऱ्याचीही टंचाई

अशी घेतली जाते काळजी

या म्हशीला रोज एक किलो तूप, पाच लिटर दूध, एक किलो काजू-बदाम, चणे आणि सोयाबीन खाण्यासाठी देतात. या म्हशीसोबत दोन लोक नेहमी असतात, ज्याचा त्यांना पगारही दिला जातो. म्हशीला प्रत्येक महिन्याला 2.50 ते 3 लाख रुपये खर्च येतो, असा दावा केला जात आहे. मागील वर्षी म्हशीची किंमत अंदाजे 2.30 कोटी रुपये इतकी होती. यावेळी म्हशीची किंमत 11 कोटी रुपये निश्चित केली आहे.

Gauri Sugar Hirdgaon Factory । गौरी शुगर हिरडगाव कारखान्याचा पहिला हप्ता 3 हजार 106 रुपये; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

दरम्यान, सृष्टीचा निर्माता ब्रह्मदेवाने कार्तिक महिन्याच्या एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस एक पुष्करमध्ये यज्ञ केला होता, असं मानलं जातं. या दरम्यान पृथ्वीवर तब्बल 33 कोटी देवी-देवतांची उपस्थित होते. त्यामुळे या दिवसांचं पुष्करमध्ये खूप महत्त्व आहे. कालांतराने हा गुरांचा मेळा म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.

Havaman Andaj । सावधान! या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *