Onion Rate

Onion Rate । आज कांद्याला किती बाजार मिळाला? जाणून घ्या एका क्लिकवर

बाजारभाव

Onion Rate । ७ डिसेंबर रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी (Onion export ban) घातली होती, त्यानंतर कांद्याच्या (Onion) दरात कमालीची घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. तसेच येत्या काही आठवड्यात खरीप कांद्याची आवक वाढल्याने घाऊक भावात आणखी घसरण होईल. दरात घसरण झाल्याने उत्पादक शेतकऱ्यांचे आणखी नुकसान होईल. (Onion price)

Son Property Rights । मुलाच्या संपत्तीत सर्वाधिक हक्क कोणाचा? आईचा की पत्नीचा? काय सांगतो कायदा जाणून घ्या

जाणून घ्या दर

आज नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याला प्रति क्विंटलमागे सरासरी 1460 रुपये दर (Lasalgaon Market Committee Onion Rate) मिळाला. बहुतांश ठिकाणी लाल कांद्याचीआवक झाली आहे. पिंपळगाव बाजार समितीत पोळ कांद्याला प्रति क्विंटल मागे सरासरी 1500 दर मिळाला. आज लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याचे पाहायला मिळाले. (Onion price falls down)

Onion export ban । कांदा निर्यात बंदी उठवण्यासंदर्भात अमित शहांची घेणार भेट, खा.डॉ.सुजय विखेंनी शेतकऱ्यांना दिला ‘हा’ शब्द

लासलगाव बाजारसमितीमध्ये आज लाल कांद्याची 6576 क्विंटल आवक झाली असून कांद्याला कमीत कमी 600 रुपये दर मिळाला आहे आणि सरासरी 1525 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. येवला अंदरसूल बाजार समितीत लाल कांद्याची 6000 क्विंटल आवक झाल्याचे पाहायला मिळाले. या कांद्याला आज कमीत कमी 450 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

Pankaja Munde । सर्वात मोठी बातमी! ऊसतोड मजुरांच्या मागणीसाठी पंकजा मुंडे करणार आंदोलन

तसेच सरासरी 1460 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. मनमाड बाजार समितीमध्ये लाल कांद्याची 4000 क्विंटल आवक झाली असून या कांद्याला कमीत कमी 400 रुपये क्विंटल दर मिळाला आहे. सरासरी 1450 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. लासलगाव – विंचू बाजार समितीमध्ये लाल कांद्याची 10700 क्विंटल आवक झाली असून या कांद्याला कमीत कमी 700 क्विंटल दर मिळाला आहे.

Crop music therapy । ऐकावं ते नवलच! हा शेतकरी आपल्या पिकाला ऐकवतोय चक्क संगीत, कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का

शेतकरी हतबल

निर्यातबंदीनंतर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली असून, त्यामुळे त्रस्त झालेले शेतकरी निर्यातबंदी हटवण्याची मागणी करत आंदोलन करत आहेत. दरम्यान,आवक वाढल्याने शेतकऱ्यांना मिळालेला भाव आणखी कमी होण्याची भीती आहे. राज्यात लवकरच निवडणुका पार पडणार आहेत, त्यापूर्वी कांद्याला चांगला भाव मिळतो का हे पाहणे महत्त्वाचे असेल.

Land Rule । तुमचाही शेतात जाणारा रस्ता अडवला आहे? काळजी करू नका, फक्त करा ‘हे’ काम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *