Onion Exprot Ban । 7 डिसेंबर रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी (Onion Exprot) घातली होती, त्यानंतर कांद्याच्या दरात कमालीची घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. तसेच येत्या काही आठवड्यात खरीप कांद्याची (Onion) आवक वाढल्याने घाऊक भावात आणखी घसरण होईल. दरात घसरण (Onion rate falls) झाल्याने उत्पादक शेतकऱ्यांचे आणखी नुकसान होईल.
PM Kisan Yojana । वडील आणि मुलालाही घेता येणार PM किसान योजनेचा लाभ? काय सांगतो नियम? जाणून घ्या
निर्यातबंदीनंतर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कांद्याच्या भावात (Onion rate) मोठी घसरण झाल्याने त्रस्त झालेले शेतकरी निर्यातबंदी हटवण्याची मागणी करत आंदोलन करत आहेत. दरम्यान,आवक वाढल्याने शेतकऱ्यांना मिळालेला भाव आणखी कमी होण्याची भीती आहे. राज्यात लवकरच निवडणुका पार पडणार आहेत, त्यापूर्वी कांद्याला चांगला भाव मिळतो का हे पाहणे महत्त्वाचे असेल.
रखडली शेतकऱ्यांच्या मुलांची लग्ने
कांद्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांची लग्ने रखडली असल्याची धक्कादायक बाब आता समोर आली आहे. तुळशी विवाह झाल्यानंतर लग्नसराईला सुरुवात होते. यावेळी कांद्याचा देखील बाजारभाव सुरु असतो. यंदा मात्र कांद्याचे दर कमी झाले आहेत. दर नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. साहजिकच याचा शेतकऱ्यांच्या घरातील शुभकार्यावर परिणाम झाला आहे.
शेतकरी आर्थिक संकटात
पैसे नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. काही शेतकऱ्यांनी पैसे नसल्याने आपल्या मुला-मुलींची लग्ने पुढं ढकलली आहेत. दरम्यान, कांदा निर्यात बंदीच्या निर्णयांनंतर कांद्याचे बाजार भाव 1800 ते 2000 रुपयांपर्यंत खाली आले असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रती क्विंटल मागे दोन हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.
Government Schemes । मोदी सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना देणार 36 हजार रुपये, अशाप्रकारे करा अर्ज
अशावेळी शेतकऱ्यांनी स्वतःच्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करायचे की मुला मुलींचे लग्न करायचे? अशी समस्या निर्माण झाली आहे. जर ही परिस्थिती कायम राहिली तर शेतकऱ्यांवर आणखी वाईट वेळ येईल. केंद्र सरकारने आतातरी निर्यातबंदी मागे घ्यावी, अशी अपेक्षा शेतकरीवर्ग व्यक्त करत आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष सरकारच्या भूमिकेकडे लागले आहे.
Agriculture Well । सरकारी योजनेअंतर्गत राज्यात पाच वर्षांत दहा लाख सिंचन विहरींचे उद्दिष्ट