Success Story । शेतकरी आता पारंपरिक पद्धत सोडून आधुनिक पद्धतीने शेती करू लागले आहेत. ज्याचा त्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होत आहे. तरुण वर्गाला देखील शेतीचे महत्त्व समजले असून ते देखील नोकरी सोडून शेती करू लागले आहेत. शेतकरी अनेक अडचणींवर मात करत शेतीत चांगली कमाई करत असल्याचे पाहायला मिळत आहे. (Farmer Success Story)
Government Schemes । मोदी सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना देणार 36 हजार रुपये, अशाप्रकारे करा अर्ज
मिळवले 10 लाखांचे उत्पन्न
छत्रपती संभाजी नगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील चिंचखोडा या गावातील एका शेतकऱ्याने 1 एकर आले लागवडीतून (Ginger cultivation) तब्बल 10 लाखांचे उत्पन्न मिळवले आहे. त्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. राहुल डुबे (Rahul Dube) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी आल्याच्या पिकातून बक्कळ कमाई करून दाखवली आहे. त्यांच्याकडे १० एकर शेती असून दरवर्षी ते आल्याचे पीक घेतात. (Ginger cultivation information)
Agriculture Well । सरकारी योजनेअंतर्गत राज्यात पाच वर्षांत दहा लाख सिंचन विहरींचे उद्दिष्ट
असे केले नियोजन
तसेच ते कपाशी,तूर, मका आणि गहू अशी देखील पिके घेतात. त्यातून त्यांना चांगला नफा मिळतो. खत म्हणून त्यांनी एकरी तीन ते चार ट्रॉली शेणखत टाकून शेतीची मशागत करतात आणि आल्याची लागवड करतात. सुरुवातीला त्यांनी निंबोळी पेंड, डीएपी तसेच सुपर फॉस्फेट आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये इत्यादींचा बेसल डोस देतात. कीड आणि बुरशीचा प्रादुर्भावानुसार फवारणी करतात.
Government schemes । आनंदाची बातमी! ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार ५० हजारांचे अनुदान
त्यांनी पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला आहे. त्यामुळे त्यांना जास्त पाण्याची गरज भासत नाही. मागील वर्षी त्यांनी एकरी 140 क्विंटल आल्याचे उत्पादन घेतले होते. सुरुवातीला बाजार भाव कमी होता यामुळे त्यांना तीन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल दर आल्याला मिळाला. या दराने त्यांना तीन ते चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.
Milk production । ‘या’ देशात केले जाते सर्वात जास्त दूध उत्पादन; वाचा बातमी
जर यंदा देखील आल्याला त्या पद्धतीने बाजार भाव मिळाले तर यावर्षीचा त्यांना एकरी 150 क्विंटल उत्पादन मिळेल असा अंदाज आहे. असे झाले तर त्यांना सरासरी नऊ ते दहा लाख रुपयांचे उत्पन्न एका एकरात मिळण्याची अपेक्षा आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने व्यवस्थापन करत त्यांनी चांगले उत्पादन मिळवून दाखवले आहे.
Desi Ber । गावरान बोरांनी गाठला उच्चांक, प्रतिक्विंटल मिळतोय १००० ते २००० रुपयांचा दर