Success Story । भारताची कृषिप्रधान देश म्हणून ओळख आहे. शिवाय अर्थव्यवस्थेत देखील शेतीचा मोठा वाटा आहे. येथील शेतकरी ऊस, कापूस, गहू, मका तसेच विविध भाज्यांचे उत्पादन घेतात. शेतकरी आता पारंपरिक पद्धत सोडून आधुनिक पद्धतीने शेती करू लागले आहेत. परंतु शेतकरी मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड करतात. उसाचे देखील विविध वाण आहेत.
काही वाणामुळे शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन मिळते. बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे सभासद, निष्णांत कायदेतज्ञ संजय जगताप यांनी योग्य नियोजनाने चांगली कमाई (Baramati Successful Farmer) केली आहे. जगताप यांना लहानपणापासूनच शेतीची प्रचंड आवड आहे. वकिली करत करत त्यांनी आपली शेतीची आवड जपत भरघोस उत्पादन घेतले आहे. त्यांना एकरी तब्बल 138 टन उसाचे उत्पादन घेण्यात यश आले आहे.
महत्त्वाचे म्हणजे देशाचे माजी कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना भुरळ पडली आहे. शरद पवारांनी थेट त्यांच्या बांधावर जात त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे. त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देखील दिल्या. जगताप यांनी उसाचे पीक (Farmer Success Story) घेण्याअगोदर केळीची लागवड (Cultivation of banana) केली होती. परंतु, केळीनंतर उसाची लागवड (Cultivation of sugarcane) करण्याचा निर्णय जगताप यांनी घेतला.
Corn Crop Management । मका लागवड करताना लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, मिळेल भरघोस उत्पादन
अशी केली लागवड
उसाच्या लागवडीसाठी जगताप यांनी सात फूट अंतरावर सऱ्या घेतल्या. लागवडीसाठी सांगली जिल्ह्यातील आष्टा या ठिकाणाहून उसाच्या को 86032 या जातीचे बेणे मागवले. त्यानंतर त्यांनी दीड फूट अंतरावर एकूण 4200 रोपांची लागवड केली. इतकेच नाही तर त्यांनी ऊस तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार रासायनिक खतांचा देखील वापर केला. विद्राव्य खतांसाठी आणि पाण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला.
Organic Vegetables । मस्तच! आता सेंद्रिय भाजीपाला पिकवून मिळवा सरकारी अनुदान, असा घ्या लाभ
खर्च आणि कमाई
महत्त्वाचे म्हणजे त्यांनी ऊस दहा ते बारा आणि 20 ते 22 कांड्यांचा झाल्यावर उसाचे पाचट काढून टाकले. असे केल्याने उसाची चांगली वाढ होऊन ऊस 40 ते 50 कांड्यांचा तयार झाला. माळेगाव सहकारी साखर कारखान्याने त्यांच्या उसाला 3411 रुपयांचा दर दिला आहे. जगताप यांच्या मतानुसार, 138 टन उसाच्या मोबदल्यात त्यांना चार लाख 83 हजार रुपयांचे उत्पन्न घेता आले आहे. खर्च वजा जाता साडेतीन लाख रुपयांची कमाई त्यांना एक एकरमधून करता आली आहे. त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Cotton Price । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पांढऱ्या सोन्याचे वाढले दर, महिन्याभरात होणार आणखी वाढ