Corn Crop Management

Corn Crop Management । मका लागवड करताना लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, मिळेल भरघोस उत्पादन

कृषी सल्ला

Corn Crop Management । राज्यात मोठ्या प्रमाणात मक्याचे पीक घेतले जाते. मका जनावरांसाठी चारा म्हणून खाऊ घातली जाते शिवाय तिची विक्री (Corn Crop) देखील करता येते. दुहेरी फायदा होत असल्याने शेतकरी मका लागवड करतात. खरीप तसेच रब्बी हंगामातही मका लागवड करण्यात येते. जर तुम्हाला भरघोस उत्पादन मिळवायचे असेल तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागणार आहेत.

Organic Vegetables । मस्तच! आता सेंद्रिय भाजीपाला पिकवून मिळवा सरकारी अनुदान, असा घ्या लाभ

रब्बी हंगामात शेतकरी गहू आणि हरभरा पिकांसह मका लागवड (Corn Crop Cultivation) करतात. कारण या हंगामातील तापमान आणि वातावरण मका या पिकासाठी खूप फायदेशीर असते. शेतकरी पुर्वी खरीप हंगामात मका पीक घेतल्यानंतर रब्बी हंगामात मका घेत नव्हते ,परंतु आता शेतकरी रब्बी हंगामात मका पीक चांगल्याप्रकारे येत असल्याने मका क्षेत्रात वाढ (Corn Crop Cultivation Information) होत आहे.

Cotton Price । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पांढऱ्या सोन्याचे वाढले दर, महिन्याभरात होणार आणखी वाढ

लक्षात ठेवा या गोष्टी

  • करा या वाणाची लागवड

भरघोस उत्पादनासाठी बायो 9637, संगम महाराजा, बायो 9681, कुबेर, राजश्री, फुले महर्षी, एचक्यूपीएम एक, पुसा संकरित मका एक, विवेक संकरित मका 21 व पुसा संकरित मका सत्तावीस हे संकरित आणि आफ्रिकन टॉल या प्रकारातील संमिश्र वाण लागवड करू शकता.

Success Story । काय सांगता! दोन एकरात 11 प्रकारची पिकं, ही महिला वर्षाला कमावतेय 7 लाख रुपये

  • लागवड प्रक्रिया

समजा तुम्हाला मध्यम आणि उशिरा कालावधीमध्ये तयार होणाऱ्या वाणाची लागवड करायची असल्यास ती साधारणपणे 75 बाय वीस सेंटीमीटर अंतरावर करावी. लवकर काढणीस म्हणजेच पक्व होणाऱ्या वाणाची लागवड करायची असल्यास 60 बाय 20 सेंटीमीटर अंतरावर टोकन पद्धतीने करा.

Success Story । हा पठ्ठया वयाच्या २३ व्या वर्षी करतोय गावरान कोंबड्या पाळून करोडोंची कमाई, कसं ते जाणून घ्या..

  • लागवड कालावधी

रब्बी हंगामात 15 ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबरच्या दरम्यान लागवड (Corn Cultivation) करावी. एखादा आठवडा उशीर झाला तरी हरकत नाही. उत्तम पाण्याचा निचरा होणारी, मध्यम ते भारी तसेच खोल आणि रेतीयुक्त आणि चांगली पाणी धारणक्षमता असलेली जमीन चांगली आहे. जमिनीचा सामु हा साडेसहा ते साडेसात दरम्यान असावा.

Tomato Diseases । टोमॅटोच्या फुलांना गळण्यापासून कसे वाचवावे, जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती

  • खत व्यवस्थापन

पेरणी किंवा लागवड करत असताना प्रतिहेक्टरी 88 किलो युरिया, 378 किलो सिंगल सुपर फॉस्फेट,68 किलो म्युरेट ऑफ पोटॅश खत द्यावे. पेरणीनंतर किंवा लागवडीनंतर 30 ते 45 दिवसांनी प्रत्येकी 88 किलो युरिया प्रति हेक्टर देणे गरजेचे आहे. माती परीक्षण करून खतांचे नियोजन करावे. झिंक सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असल्यास तर पेरणीच्या वेळी हेक्‍टरी 20 ते 25 किलो झिंक सल्फेट द्यावे.

Agriculture Subject । मोठी बातमी! पुढील शैक्षणिक वर्षापासून होणार शालेय अभ्यासक्रमात शेती विषय समाविष्ट

मुरघास

हल्ली मुरघास करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. मका लागवड केल्यास शेतकऱ्यांना मका लागवडीतून मका पिकाच्या उत्पादनासोबत मुरघासाला चांगली मागणी असते. त्यामुळे मागणी जास्त असल्याने शेतकऱ्यांना चार पैसे जास्त मिळतात.

Agriculture Technology । भारीच! शेततळ्यात कुणी पडल्यास सेकंदात वाजणार अलार्म, विद्यार्थ्यांचा अफलातून शोध

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *