Success Story

Success Story । हा पठ्ठया वयाच्या २३ व्या वर्षी करतोय गावरान कोंबड्या पाळून करोडोंची कमाई, कसं ते जाणून घ्या..

यशोगाथा

Success Story । सध्या एका तरुणाची चांगलीच चर्चा होत आहे. यामागचं कारण म्हणजे त्याची कामगिरी. या तरुणाने वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी करोडो रुपयांची कमाई करून समाजातील इतर तरुणांसमोर आदर्श घालून दिला आहे. अनेक तरुण नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहेत. त्यातून त्यांना चांगली कमाई करता येत आहे. व्यवसायामुळे इतरांना देखील रोजगार मिळतो.

Tomato Diseases । टोमॅटोच्या फुलांना गळण्यापासून कसे वाचवावे, जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती

गावरान कोंबड्यांना बाजारात चांगली मागणी असते. मागणी जास्त असल्याने त्यांच्या किमती जास्त असतात. अनेकजण गावरान कुक्कुटपालन (Poultry farming) करतात. सौरभ तापकीर या तरुणाने देखील हाच विचार करून गावरान कुक्कुटपालन (Poultry farming information) करण्यास सुरुवात केली. तो चांदखेड गावाचा रहिवासी आहे. पुण्यापासून २० किलोमीटर अंतरावर हे गाव वसले आहे. कसे केले त्याने व्यवसायाचे नियोजन? जाणून घेऊयात.

Agriculture Subject । मोठी बातमी! पुढील शैक्षणिक वर्षापासून होणार शालेय अभ्यासक्रमात शेती विषय समाविष्ट

कशी केली सुरुवात?

सौरभचे वडील वडापाव विक्री करत होते. सौरभही देखील त्यांना मदत करायचा. सौरभला कब्बडी या खेळाची आवड होती. त्यामुळे त्याला निरोगी आरोग्यासाठी अंडी, चिकन खावे लागत होते. परंतु दररोज अंडी कुठून आणून द्यायची? असा प्रश्न उभा राहिला. शिवाय ते राहत असणाऱ्या भागात गावरान कोंबड्या पाळणारे शेतकरी जास्त नव्हते. त्यामुले त्याच्या वडिलांनी २०१६ साली घरी कोंबड्या आणून पाळायला (Poultry) सुरूवात केली.

Sugarcane Rate । अखेर शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला मोठं यश! टनामागे मिळणार १०० रूपये जास्तीचा दर

यापासून त्याला अंडी मिळायची शिवाय त्यांनी पिल्ले वाढवण्यास सुरूवात केली. काही दिवसातच त्यांच्याकडे ४०० ते ५०० कोंबड्या तयार झाल्या. आसपासचे नागरिक देखील त्यांच्याकडे कोंबडी आणि गावरान अंड्याची मागणी करू लागले. शहरी भागातून नागरिक मोठ्या प्रमाणात अंडी आणि कोंबड्या मागत होते. शेतकऱ्यांना तो पिल्ले पुरवत असत. त्यांच्याकडे तयार होणारा माल तो पुणे आणि मुंबईसारख्या सोसायट्यांमध्ये विकत.

Havaman Andaj । राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, हवामान खात्याने दिला अलर्ट

यात त्याला सेंद्रीय शेतकऱ्यांच्या अभिनव फार्मर्स क्लबची खूप मदत झाली. या फार्मर्स क्लबकडून भाजीपाला ज्या सोसायट्यांमध्ये पोहोचवला जायचा त्याच सोसायट्यांमध्ये तो अंडी आणि चिकन विक्री करायचा. परंतु त्याला या कामात खूप अडचण आली. कारण अंडे ताजे आहे का की खराब आहे? असे प्रश्न ग्राहक विचारू लागले. कारण त्या अंड्यांना व्यवस्थित पॅकिंग नव्हते.

Agriculture Technology । भारीच! शेततळ्यात कुणी पडल्यास सेकंदात वाजणार अलार्म, विद्यार्थ्यांचा अफलातून शोध

अशी तयार केली कंपनी

हीच अडचण लक्षात घेता त्याने ‘नेचर्स बेस्ट’ नावाची कंपनी स्थापन केली. एका बॉक्समध्ये १२ अंडी असून बॉक्स २४० रुपयांना तो ग्राहकांना विकायचा. शिवाय तो प्रत्येक रविवारी शेतकऱ्यांना गावरान कुक्कुटपालनाचे सशुल्क प्रशिक्षण देतो. ज्या शेतकऱ्यांना अंडी विकताना अडचण येते, त्यांचा तो माल खरेदी करून स्वतः विक्री करतो. त्याच्या कंपनीसोबत आज ३००० शेतकरी जोडले गेले आहेत.

Export Of Fruits And Vegetables । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता सागरी मार्गाने होणार फळे आणि भाजीपाल्यांची निर्यात

कमाई

या कंपनीद्वारे मुंबई आणि पुण्यामध्ये रोज ८० हजार ते १ लाख ३० हजार गावरान अंड्यांची विक्री करते. पॅकिंग केलेले एक अंडे २० रूपये नगाप्रमाणे विक्री करण्यात येते. जिवंत कोंबडीसुद्धा मागणीनुसार कमीजास्त दरात विकली जाते. कमीत कमी ६०० रूपये प्रतिकिलो आणि जास्तीत जास्त १ हजार २०० रूपये प्रतिकिलो प्रमाणे जिवंत कोंबडी विकली जाते. शेतकऱ्यांना पिल्ले पुरवणे तसेच प्रशिक्षणातून मिळालेल्या उत्पन्नातून असे मिळून एका महिन्यात कंपनी ५ ते ६ कोटी रूपयांची उलाढाल करते.

Jowar Rate । ज्वारी खातेय भाव! किलोला मिळतोय ६० ते ६५ रूपायांचा दर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *