Agriculture Technology

Agriculture Technology । भारीच! शेततळ्यात कुणी पडल्यास सेकंदात वाजणार अलार्म, विद्यार्थ्यांचा अफलातून शोध

तंत्रज्ञान

Agriculture Technology । अलीकडच्या काळात शेतीत आधुनिक तंत्रज्ञाचा जास्त वापर होऊ लागला आहे. या तंत्रज्ञामुळे शेतीत कमी मनुष्यबळाचा वापर होऊ लागला आहे. शिवाय शेतकऱ्यांचा वेळ वाचत आहे आणि जास्त पैसे खर्च करावा लागत नाही. ज्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. सध्या एक शोध विद्यार्थ्यांनी लावला आहे. ज्यामुळे एखादा व्यक्ती शेततळ्यात पडला तर काही सेकंदात अलार्म (Alarm) वाजणार आहे.

Havaman Andaj । सावधान! राज्यात उद्यापासून ‘या’ ठिकाणी पडणार मुसळधार पाऊस

पाण्याची समस्या असल्याने सध्या शेतकरी शेततळे बांधत (Amazing Agriculture Technology) आहेत. सरकार देखील त्यास प्रोत्साहन देत आहेत. परंतु शेततळ्यामुळे अनेक दुर्घटना होत आहेत. यात अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे अनेक संसार उध्वस्त होतात. परंतु, आता तसे होणार नाही. कारण इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी एक अफलातून (Amazing Agriculture Project) शोध लावला आहे. ज्याच्या मदतीने अशा घटनांना आळा बसणार आहे.

Export Of Fruits And Vegetables । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता सागरी मार्गाने होणार फळे आणि भाजीपाल्यांची निर्यात

बनवले भन्नाट यंत्र

शेततळ्यात पडला तरीही जीव वाचावा यासाठी नाशिक येथील के के वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी उपाय शोधला आहे. त्यांनी खास शेतकऱ्यांसाठी लेझर अलर्ट सिस्टीम (Laser Alert System) तयार केली आहे. लेझर परिक्षेत्रात कुणी व्यक्ती आला तर तातडीने संबंधित शेततळे असणाऱ्या शेतकऱ्यास काही सेकंदात इमर्जन्सीचा अलर्ट मॅसेज येईल.

Jowar Rate । ज्वारी खातेय भाव! किलोला मिळतोय ६० ते ६५ रूपायांचा दर

खर्च

या महाविद्यालयाच्या अवघ्या पाच विद्यार्थ्यांनी केवळ पंधरा दिवसांत हा प्रकल्प पूर्ण केला आहे. खर्चाचा विचार करायचा झाला तर यासाठी तीन हजार रुपयांचा खर्च आला आहे. इतकेच नाही तर येणाऱ्या काळात या अँपच्या माध्यमातून हे यंत्र शेतकऱ्यांपर्यंत पोहचविले जाणार आहे. या यंत्राचा शेतकऱ्यांना खूप फायदा होईल.

Pune Buffelo farming । पुण्यातील सर्वात मोठा म्हशीचा गोठा, दररोज ३०० लिटर दुध होत संकलित

कसे करते काम?

अनेक शेततळी खुल्या स्वरूपात असल्याने लेझरच्या माध्यमातून ही यंत्रणा राबविली आहे. या शेततळ्याच्या एका बाजूला आरडीनो स्वरूपाचे यंत्र लावले आहे. शेततळ्याच्या चारही बाजूला आरसे लावून लेझर इंडिक्ट केले आहे. या लेझरच्या कार्यक्षेत्रात जो कोणी माणूस येईल, त्यावेळी लागलीच काही सेकंदात बझर अलार्म वाजेल. इतकेच नाही तर तातडीने अलर्ट मॅसेज सुद्धा शेतकऱ्याच्या मोबाईलवर जाईल, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या यंत्रणेसाठी माणसाच्या उंची आणि हालचालीचा विचार केला आहे.

Cabinet Decision । महिलांसाठी सरकारचा मोठा निर्णय! मिळणार ‘हे’ लाभ, जाणून घ्या..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *