Havaman Andaj

Havaman Andaj । सावधान! राज्यात उद्यापासून ‘या’ ठिकाणी पडणार मुसळधार पाऊस

हवामान

Havaman Andaj । राज्यात पावसाने यंदा चांगलीच फजिती केली आहे. कारण यावर्षी उशिरा पाऊस पडला, त्यात काही ठिकाणी पावसाने पाठ फिरवली. खरीप हंगामातील पिके पाण्याविना जळून गेली. हिवाळा सुरु होताच पाण्याची कमतरता भासू लागली आहे. नदी, नाले आणि धरणांनी तळ गाठला आहे. अशातच आता पुन्हा एकदा राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस (Weather Update) पडणार आहे.

Export Of Fruits And Vegetables । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता सागरी मार्गाने होणार फळे आणि भाजीपाल्यांची निर्यात

नागरिकांचे जर काही काम असेल तर हवामान खात्याचा (IMD Update) अंदाज जाणूनच बाहेर पडावे. हवामान खात्याकडून राज्यात चार दिवस पावसाचा इशारा (Rain Upadte) देण्यात आला आहे. काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस (Weather Forecast) पडू शकतो. या पावसामुळे पिकांना पुन्हा एकदा उभारी मिळू शकते. तसेच काही जिल्ह्यात कोरड्या हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Jowar Rate । ज्वारी खातेय भाव! किलोला मिळतोय ६० ते ६५ रूपायांचा दर

या जिल्ह्यात पडणार पाऊस

उद्या रायगड, कोल्हापुर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे. शनिवारी पुणे जिल्हा पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई, रायगड, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, जालना, बीड, लातूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडू शकतो.

Pune Buffelo farming । पुण्यातील सर्वात मोठा म्हशीचा गोठा, दररोज ३०० लिटर दुध होत संकलित

त्याशिवाय हिंगोली, नांदेड, परभणी आणि जळगाव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रविवारी उत्तर महाराष्ट्र, कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी केला असून पुणे, कोल्हापुर, सातारा, सांगली, पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, नंदुरबार, जळगाव, रायगड, रत्नागिरी, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धारशिव, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.

Cabinet Decision । महिलांसाठी सरकारचा मोठा निर्णय! मिळणार ‘हे’ लाभ, जाणून घ्या..

हवामानात बदल

दरम्यान, सध्या देशातील हवामान बदलत आहे. राज्यात थंडीची चाहूल लागली असून दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये हळूहळू तापमानात घट होत चालली आहे. परंतु, दक्षिण भारतासह ईशान्येकडील अनेक भागात अजूनही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. आगामी काही दिवसांत हवामानात मोठा बदल होऊ शकतो.

Tomato Price । टोमॅटो उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! वाढले दर, किलोला मिळतोय ६० रुपयांवर भाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *