Pune Buffelo farming । शेतीसोबत जोडव्यवासाय म्हणुन पशुपालन केल्यानं याचा फायदा शेतक-यांना होऊ लागला आहे. महत्वाची बाब म्हणजे या व्यवसायात जास्त नफा मिळवण्यासाठण जास्त दूध देणार्या जनावरांची निवड करावी लागते. योग्य नियोजन आणि अपार कष्टाच्या जोरावर शेतकरी बंधू लाखो रुपायांचा नफा मिळवू लागले आहेत. गायीच्या दुधापेक्षा म्हशीच्या दुधाला जास्त मागणी असते.
Cabinet Decision । महिलांसाठी सरकारचा मोठा निर्णय! मिळणार ‘हे’ लाभ, जाणून घ्या..
साहजिकच मागणी जास्त असल्याने म्हशीच्या दुधाची किंमत जास्त असते. त्यामुळे अनेकजण म्हशीचे पालन करत आहेत. लोहगावमध्ये निंबाळकर डेअरी फार्म आहे. यामध्ये ५०-६० म्हशी पाळल्या आहेत. ७ गुंठ्याच्या जागेवर फार्म आहे. बबन निंबाळकर असे या फार्मच्या मालकाचे नाव आहे. विशेष बाब म्हणजे त्यांचे वय ८० वर्ष आहे. ४० वर्षापासून त्यांचा हा व्यवसाय आहे या गोठ्यात ५ गाई २ बैल देखील आहेत.
Tomato Price । टोमॅटो उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! वाढले दर, किलोला मिळतोय ६० रुपयांवर भाव
या म्हशीच्या जातीचे करतात संगोपन
निंबाळकर यांच्या गोठ्यामध्ये विविध जातीच्या म्हशी आहेत यात मुर्हा, जाफर, मुंडा भाणि दिल्ली या जातीच्या म्हशींचा समावेश आहे. सोबत गीर गाई देखील आहेत.
या जातीची म्हैस फायदेशीर
निंबाळकर यांनी प्रचंड मेहनत, कष्टाच्या जोरावर हा व्यवसाय उभारला आहे. त्यांच्याकडे जरी ५ जातींच्या म्हशी असल्या तरी त्यांना मुर्हा जातीची म्हैस फायदेशीर वाटते, यामागचे कारण म्हणजे ती जास्त दूध देते त्यांच्याकडे २० मुर्हा जातीच्या म्हशी असुन त्यांनी त्या चाकणमधून खरेदी केली आहे. शिवाय त्यांनी गुजरातमधून देखील म्हशी खरेदी केल्या आहेत.
किती मिळतो दर?
पूर्वी म्हशीच्या दुधाला ३० रुपये की रुपायांचा दर मिळत असायचा. महागाई वाढल्याने म्हशीचे दूध दर वाढले आहे. सध्या म्हशीच्या दुधाचा दर ६० रुपये लिटर माहे. शिवाय निंबाळकर चारा विकत घेतात. रोजचे ३०० लिटर दुध संकलित होते.
उत्पन्न आणि खर्च
उत्पन्नाबद्दल बोलायचे झाले तर निबांळकर यांना दिवसाला दुध विक्रीतून १७ हजार रुपये मिळतात. तर महिन्याला १४ हजार रुपायांचा खर्च होतो. परंतु कधी कधी यात बदलही होतो.