Success Story । आपल्याकडे सर्वकाही असावे, असे अनेकांना वाटत असते. ते मिळवण्यासाठी असंख्य तरुण खेड्यातून शहरांकडे वळत आहेत. चांगले शिक्षण घेतलेल्या तरुणांना असे वाटते की शिक्षणानंतर जगण्याचा एकमेव मार्ग म्हणजे नोकरी. परंतु, त्यांना नोकरीतूनही चांगली कामे करता येत नाही. त्यामुळे आता अनेक तरुण गावी परत येऊन शेतीकडे वळू लागले आहेत.
शेतीला जोडव्यवसाय म्हणून अनेकजण शेळीपालनाचा व्यवसाय (Goat rearing) करत आहेत. गरिबांची गाय म्हणून शेळीची ओळख आहे. जर तुम्हाला या व्यवसायात जास्त नफा मिळवायचा असेल तर तुम्हाला जास्त नफा मिळवून देणाऱ्या प्रजातींची निवड करावी लागते. कमी जागेत आणि महत्त्वाचे म्हणजे कमी खर्चात तुम्हाला शेळीचे संगोपन करता येते, खर्च कमी आणि नफा जास्त असल्याने अनेकजण शेळीपालन (Goat rearing information) करतात.
Milk Rate | दूध दराबाबत सरकारची महत्त्वपूर्ण बैठक! नेमका काय झाला निर्णय?
अशी केली सुरुवात
विशेष म्हणजे तरुणवर्ग शेळीपालन करत आहेत. योगेश कैलास शेवाळे आणि अविनाश कैलास शेवाळे यांनीही शेळीपालनाचा व्यवसाय सुरु केला आहे. वैजापूर तालुक्यातील बोरसर या गावात ते राहतात. या दोन बंधूनी गुजरात आणि पंजाबच्या काही गावांमध्ये फिरून शेळ्या तसेच बोकडाची खरेदी केली. त्यांच्याकडे बिटल आणि शिरोही या जातीच्या शेळ्या आहेत. शेळीपालनासोबत ते शेतीत विविध पिकांचे उत्पादन घेतात.
त्यांनी या व्यवसायाला घराच्या अंगणामधून सुरुवात केली. त्यांच्याकडे आज 85 बाय 45 आणि 90 बाय 45 फूट लांबी रुंदीचे असे दोन अत्याधुनिक शेड आहेत. यशोधन गोट फार्मची त्यांनी उभारणी केली असून त्यात आजारी शेळ्या वेगळ्या कप्प्यात, गाभण शेळी, बोकड आणि शेळ्यांची पिल्ले वेगळ्या कप्प्यात असतात. सध्या त्यांच्याकडे 35 बिटल, वीस शिरोही जातीच्या शेळ्या आहेत. शिवाय त्यांच्याकडे 40 ते 45 करडे आहेत.
कमाई
शेळ्यांच्या चाऱ्यासाठी त्यांनी शेतात सात ते आठ गुंठ्यात मेथी घास, तेरा गुंठे क्षेत्रामध्ये 4 जी नेपियर चारा पिकांची लागवड केली आहे. चाऱ्यासाठी ते खरीप आणि रब्बी हंगामात दोन एकर पर्यंत मका लागवड करून मक्याचे उत्पादन घेतात. हिरव्या मक्यापासून मुरघास तयार करून मक्याची भरड शेळ्यांना खुराकामध्ये देतात. बोकड, शेळी तसेच करडांच्या माध्यमातून वर्षाला ते पाच ते सहा लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवतात.