Milk rate

Milk rate । अर्रर्रर्र! दूध दरातून उत्पादनाचा खर्चही निघेना, शेतकऱ्यांसमोर मोठे संकट

पशुसंवर्धन

Milk rate । शेतीतून प्रत्येकाला नफा मिळतो असे नाही. त्यामुळे अनेकजण शेतीसोबत जोडव्यवसाय म्हणून अनेकजण दुध व्यवसाय (Milk business) करतात. अनेकांना या व्यवसायात चांगला नफा मिळवता येतो. परंतु, यंदा हा व्यवसाय अडचणीत आला आहे. कारण यंदा दुधाचे दर कमालीचे घसरले (Milk rate falls down) आहेत. शिवाय पावसाअभावी पिके जळून गेली आहेत. पिके जळाल्याने चारा खूप महाग झाला आहे. पशुपालनाचा व्यवसाय देखील धोक्यात आला आहे.

Drought in Maharashtra । मोठी बातमी! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या संमतीनंतरच कर्जाचे पुनर्गठन होईल

पशुपालनाचा व्यवसाय धोक्यात

जरी अनेक शेतकरी जोडव्यवसाय म्हणून पशुपालनाच्या व्यवसायाकडे वळत असले तरी सध्या हा व्यवसाय (Milk price) धोक्यात आला आहे. दूध उत्पादक शेतकरी सरकारचे याकडे लक्ष नसल्याचा आरोप करत आहेत. चांगला हमीभाव मिळण्यासाठी शेतकरी आंदोलन देखील करत आहेत. तसेच यंदा राज्यातील ४० तालुक्यात सरकारने दुष्काळ (Drought in Maharashtra) जाहीर केला आहे. शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट उभा राहिले आहे.

PM Kisan 16th Installment । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी जमा होणार पीएम किसानचा 16 वा हप्ता

गेल्या वर्षीपेक्षा यंदा दुधाचे दर (Cow Milk Rate) आठ ते दहा रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी सरकारवर नाराजी व्यक्त करत आहेत. दुधाला सध्या पाच रुपये अनुदान जाहीर केले आहे. परंतु ते देखील अपुरे आहे. यंदा पाऊस न पडल्याने नदी-नाले, विहिरी, बोअरवेलने तळ गाठला आहे. साहजिकच पाणी उपलब्ध नसल्याने चारा जळून गेला आहे.

Agriculture Machine । हे एकच यंत्र करतंय शेतातील अनेक कामे, जाणून घ्या किंमत; पाहा Video

पशुखाद्यही महागले

याशिवाय पशुखाद्याचे भाव ३५०० ते ४००० क्विंटलपर्यंत गेले आहेत. एकंदरीतच दूध उत्पादनाचा खर्च खूप वाढला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. सरकार देखील याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरम्यान, संपूर्ण राज्याचे सहकारी आणि खासगी संघाचे दूध संकलन दीड लाख लिटरपर्यंत होते.

Most Expensive Potato । जगातील सर्वाधिक महागडं बटाटे, सोने-चांदीपेक्षाही आहे महाग; किंमत जाणून बसेल आश्चर्याचा धक्का

त्यामध्ये सव्वा लाख लिटरचा वाटा ८ जिल्ह्यात आहे. सहकारी संघाचे सर्वात जास्त संकलन कोल्हापूर तर खासगी संघाचे संकलन अहमदनगर जिल्ह्यात होते. परंतु, सरकारने केवळ सहकारी संघांना दूध पुरवठा करणाऱ्या दुधाला अनुदान जाहीर केले आहे. यामुळे देखील शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. यावर आता तोडगा निघतो का? हे पाहणे महत्त्वाचे असेल.

Success Story । गलेगठ्ठ पगार असणाऱ्या नोकरीवर मारली लाथ, लिंबाच्या बागेतून शेतकरी करत आहे लाखोंची कमाई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *