Success Story । हल्ली फळबागांच्या (Orchards) माध्यमातून अनेक शेतकऱ्यांचे नशीब रातोरात बदलत आहे. सरकार देखील फळबागांना अनुदान (Subsidy to Orchards) देत आहे. शेतकरी सरकारी अनुदान (Government Schemes) घेऊन लाखोंची कमाई करत आहेत. अनेकांना नोकरीपेक्षा शेतीतून चांगली कमाई करता येत आहे. त्यामुळे तरुणवर्ग गलेगठ्ठ पगार असणारी नोकरी सोडून शेती करत आहेत.
एक शेतकरी लिबांच्या बागेतून (Lemon farming) चांगले उत्पन्न मिळवत आहे. आनंद मिश्रा (Anand Mishra) असे या तरुणाचे नाव आहे. ते उत्तर प्रदेशातील (UP) रायबरेली जिल्ह्यातील कचनावा गावातील रहिवासी आहे. लिबांच्या बागेतून भरघोस उत्पन्न (Lemon farming income) मिळवल्याने शेतकऱ्याने समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांची प्रगती पाहता हळूहळू इतर शेतकरीही लिंबाच्या बागेची लागवड करत आहेत. (Lemon Cultivation)
लेमन मॅन
कचनावा गावात त्यांना लेमन मॅन म्हणून लोक त्यांना ओळखतात. महत्त्वाचे म्हणजे या गावात प्रवेश करताच लिंबाचा वास येतो. आनंद मिश्रा यांनी बीबीए केले आहे. त्यानंतर त्यांनी 2002 पासून फर्निचर कंपनीत कामाला सुरुवात केली. त्यांना 6 लाख रुपये वार्षिक पगाराचे पॅकेज मिळायचे. परंतु, त्यांना काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होती. त्यांनी 2016 मध्ये नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.
Onion Rate । हृदयद्रावक! कांद्याला चक्क १ रुपये दर, शेतकऱ्यासमोर मोठे आर्थिक संकट
त्यानंतर त्यांनी लिबांच्या बागेची लागवड केले. ते यापूर्वी गहू आणि धानाचे पिक घ्यायचे. परंतु त्यांना अपेक्षित उत्पादन मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी 1 वर्ष विविध प्रकारच्या बागायती शेतीची माहिती जमा केली. यावेळी त्यांनी लिंबाची लागवड करण्याचा निर्णय घेतला. कारण लिंबाला मागणी वर्षभर राहते. त्यांनी दोन एकर शेतात सात प्रकारच्या जाती असणाऱ्या 400 हून अधिक लिंबाच्या रोपांची लागवड केली.
Bhandara News । धक्कादायक बातमी! शेतात तीन महिलांवर मधमाशांचा भयानक हल्ला, तिघीही गंभीर जखमी
नफा
लिंबाची एकदा लागवड केली की त्यापासून 25 वर्षे नफा मिळतो. विशेष म्हणजे या पिकाला जास्त कीटकनाशकांची गरज पडत नाही. लिंबावर रोगांचा धोका कमी असल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो. लिंबू वनस्पती वर्षातून दोनदा फळ देत असून मिश्रा यांच्या बागेत थाई प्रकारची जास्त झाडे आहेत. त्यांच्या शेतातून व्यापारी लिंबाची खरेदी करतात. लिंबाला 40 रुपये किलो दर (Lemon rate) मिळतो.