Feed the animals more sugarcane growth । पशुपालन हा व्यवसाय करत असताना शेतकऱ्यांना सर्वात मोठी समस्या येते ती म्हणजे जनावरांच्या चाऱ्याची. पशुपालक जनावरांच्या चाऱ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चाऱ्याचा समावेश करतात. यामध्ये बऱ्याच वेळा काही पशुपालक हे उसाचे वाढे जास्त प्रमाणात जनावरांना खाऊ घालतात. मात्र उसाचे वाढे जास्त प्रमाणात खाऊ घालणे हे देखील धोक्याचे ठरू शकते.
ऊसाचे वाढे उपलब्धतेनुसार व स्वस्त समजून याचा चारा म्हणून अतिप्रमाणात उपयोग होतो. विपूल प्रमाणात मिळत असल्यामुळे त्याचा वापर करावा, पण त्याला पूर्णपणे पर्यायी खाद्य म्हणून वापरु नये. त्याची साठवण करुन मूरघासद्वारे तथा वाळवून इतर चा-यांची उपलब्धता नसताना वापरावे.
अतिप्रमाणात वाढे वापरण्याचे काही तोटे आहेत
१. ऊसाच्या वाढयाची पचनीयता जरी ठीक असली तरी पोषणमूल्ये अत्यल्प आहेत व त्या मानाने किंमत जास्त मोजली जाते.
२. वाढयातील जास्तीचे ऑक्झलेट्स व फॉस्फरसमुळे कॅल्शियमच्या चयापचयावर परिणाम होतो म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न करुन वाढयाचा वापर मर्यादित करावा.
३. ज्या गायीच्या आहारात ऊसाच्या वाढयाचे प्रमाण जास्त होते त्या गायी पूर्ण क्षमतेने दूध देत नाहीत, जास्त काळ दूधात टिकत नाहीत व सर्वात वाईट म्हणजे गाभण होण्यासाठी फार त्रास देतात.
ऊसाच्या वाढयाची पोषणमूल्ये मोलॅसिस, युरिया, मीठ वापरुन काही प्रमाणात वाढविता येईल. अडचणीच्या काळासाठी त्याचे मूरघास करणेही शक्य आहे.
Agriculture Land । शेत जमीन विकल्यास कर भरावा लागतो का? कायदा काय सांगतो जाणून घ्या