Agriculture Land । अनेकजण आपली पैशांची कमतरता दूर करण्यासाठी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी शेतजमीन (Agriculture Land Sell) विकतात. जमिनीचे दर देखील आता खूप वाढले आहेत. तरीदेखील अनेकजण जमीन विकत घेतात. आयकर विभाग या पैशावर कर वसूल करतो का? जर कर वसूल केला तर तो कसा टाळता येईल? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात उपस्थित येत असतील. (Income Tax on Selling Agriculture Land)
काही ठराविक भागांमध्ये शेतजमिनीवर ( Land Sell) कर द्यावा लागतो. भारतीय कायद्यानुसार, जी जमीन 10,000 पेक्षा जास्त किंवा 1,00,000 पेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या नगरपालिका किंवा कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीपासून दोन किलोमीटरच्या आत आहे, अशा जमिनीच्या विक्रीवर कर द्यावा लागतो. (Tax on Agriculture Land Selling) आणि समजा जर जमीन नगरपालिका किंवा कॅंट बोर्डाच्या हद्दीत असल्यास आणि लोकसंख्या 10,000 पेक्षा जास्त असल्यास तरीसुद्धा कर द्यावा लागतो. (Land Rule)
Weather Update । सावधान! या ठिकाणी दाट धुके पडण्याची शक्यता; आयएमडीने जारी केला अलर्ट
तसेच जी जमीन 100,000 पेक्षा जास्त किंवा 10,00,000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या नगरपालिका किंवा कॅन्टोन्मेंटच्या हद्दीच्या सहा किलोमीटरच्या आत येत असेल तर अशा जमिनीच्या विक्रीवर कर द्यावा लागतो. तसेच जमीन 10,00,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या कोणत्याही नगरपालिका/कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीपासून आठ किलोमीटरच्या आत असल्यास कर द्यावा लागतो. उरलेल्या शेत जमिनीच्या विक्रीवर कर द्यावा लागत नाही, हे लक्षात ठेवा.
Onion Rate । आज कांद्याला किती बाजार मिळाला? जाणून घ्या एका क्लिकवर
एखाद्या व्यक्तीने जमीन विकल्यानंतर आपल्या मुलांना किंवा पत्नीला पैसे ट्रान्सफर केल्यास हे पैसे कराच्या कक्षेत येत नाहीत. परंतु जमीन विक्रीची महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवा. कोणतीही जमीन विकण्यापूर्वी तज्ज्ञांच्या मदतीने त्याचे मूल्यांकनही करून घ्या. पुढे तुम्हाला कोणतीही अडचण येत नाही. त्याशिवाय जी शेतजमीन शहरी भागात येते अशा शेत जमिनीच्या विक्रीवर कर द्यावा लागेल. परंतु, ग्रामीण भागातील शेत जमिन विक्रीवर कर द्यावा लागत नाही. जर तुम्हीही जमीन विकत असाल तर तुम्हाला या गोष्टी माहिती असाव्यात.