Son Property Rights । अलीकडच्या काळात सर्वात जास्त वाद हे संपत्तीवरून (Property) होत असतात. अनेकदा हे वाद टोकाला गेल्याने नाइलाजाने कोर्टाची पायरी चढावी लागते. सध्या अनेक खटले कोर्टात प्रलंबित आहेत. समजा एखाद्या कायद्याचे उल्लंघन झाले तर कोर्टात न्याय मिळतो. मुलाच्या संपत्तीवर कोणाचा अधिकार (Law of Property) आहे? आईचा की पत्नीचा असा प्रश्न अनेकांना पडतो.
भारतात काय आहे कायदा?
अशी खूप प्रकरणे समोर येतात ज्यात मृत मुलाच्या मालमत्तेत आईला हक्क मिळत नाही, जे कायद्याच्या विरोधात आहे. परंतु अनेक मातांना याची माहिती नसते त्यामुळे त्या नाइलाजाने वृद्धाश्रमात आपले जीवन व्यतीत करतात. भारतीय कायद्याच्या मदतीने ती तिच्या हक्कांसाठी लढू शकते, ज्यामुळे तिच्या मृत मुलाच्या मालमत्तेमध्ये तिला हक्क मिळतो. (Law of Property Inheritance in India)
Pankaja Munde । सर्वात मोठी बातमी! ऊसतोड मजुरांच्या मागणीसाठी पंकजा मुंडे करणार आंदोलन
मृत मुलाच्या मालमत्तेवर आईचा आणि पत्नीचा हक्क
हे लक्षात घ्या की आईला तिच्या मृत मुलाच्या मालमत्तेत तितका हिस्सा मिळतो जो पत्नी आणि मुलांना मिळतो. जर पतीच्या मालमत्तेची विभागणी केल्यास त्या मालमत्तेत पत्नीला तिच्या मुलांइतकाच हक्क मिळतो. हिंदू उत्तराधिकार कायद्याच्या कलम 8 नुसार, मुलाच्या मालमत्तेवर पालकांचे हक्क परिभाषित केले असून या अंतर्गत, आई मुलाच्या मालमत्तेची पहिली वारस आणि वडील मालमत्तेचे दुसरे वारसदार असतात.
समजा मृत व्यक्तीच्या पश्चात त्याची आई, पत्नी आणि मुले असल्यास मालमत्तेची आई, पत्नी आणि मुले यांच्यात समान वाटणी करण्यात येते. हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार, जर पुरुष अविवाहित असल्यास त्याची मालमत्ता पहिल्या वारसाला, त्याच्या आईला आणि दुसऱ्या वारसाला, त्याच्या वडिलांना हस्तांतरित केली जाते. समजा आई हयात नसल्यास मालमत्ता वडील आणि त्यांच्या सह-वारसांना हस्तांतरित करण्यात येते.
Land Rule । तुमचाही शेतात जाणारा रस्ता अडवला आहे? काळजी करू नका, फक्त करा ‘हे’ काम
समजा मृत व्यक्ती हिंदू विवाहित पुरुष असल्यास आणि मृत्युपत्राशिवाय मरण पावला असल्यास त्याच्या पत्नीला हिंदू उत्तराधिकार कायदा 1956 (Hindu Succession Act 1956) नुसार मालमत्तेचा वारस मिळतो. त्या व्यक्तीची पत्नी पहिली वारस असेल आणि ती मालमत्ता इतर कायदेशीर वारसांसोबत समान वाटून घेईल.
Success Story । स्वप्नाला मुरड घालून केली सीताफळ लागवड, लाखात होतेय कमाई