Pankaja Munde । सध्या अनेक भागात ऊस तोडणीचे (Cutting sugarcane) काम सुरु आहे. ऑक्टोबर आणि नोंव्हेबर महिन्यामध्ये ऊसतोड कामगार मुलाबाळांसह ऊसतोडीसाठी शेतात येत असतात. यंदा मात्र ऊसतोड मजुरांची संख्या खूप कमी झाली आहे. कारण मागील अनेक दिवसांपासून ऊसतोड मजूर संघटनांच्या (Sugarcane Labor Unions) मागण्या प्रलंबित आहेत. सरकारदेखील याकडे लक्ष देत नाहीत.
पंकजा मुंडे करणार आंदोलन
अशातच आता भाजप नेत्या पंकजा मुंडे मजूर संघटनांच्या मागण्यांसाठी (Demands of labor unions) आंदोलन करणार आहे. ऊसतोड मजुरांच्या आणि मुकादमांच्या मागण्यांसाठी हे आंदोलन 6 जानेवारीला केले जाईल. दरम्यान, मागण्या मान्य झाल्या नाही तर महाराष्ट्रातला एकही साखर कारखाना (Sugar factory) चालू देणार नाही असा इशारा ऊसतोड मजुरांच्या संघटनेच्या वतीने दिला आहे.
Land Rule । तुमचाही शेतात जाणारा रस्ता अडवला आहे? काळजी करू नका, फक्त करा ‘हे’ काम
याच संदर्भात पंकजा मुंडे यांच्यासोबत सर्व संघटनांनी चर्चा करत ऊसतोड मजूर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मागील काही दिवसांपासून ऊसतोड मजूर आणि मुकादम संघटना मागण्या मान्य करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सरकारने याकडे लक्ष न दिल्याने अखेर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
Success Story । स्वप्नाला मुरड घालून केली सीताफळ लागवड, लाखात होतेय कमाई
यापूर्वी या संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. परंतु आता पंकजा मुंडे यांनी मध्यस्थी केल्यानंतर 5 जानेवारीपर्यंतची साखर संघाला मुदत दिली आहे. जर ऊसतोड मजूर आणि मुकादम संघटनांची 5 जानेवारीपर्यंत मागण्या मान्य झाली नाही तर 6 जानेवारीला पंकजा मुंडे या आपल्या संघटनांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे. यावेळी सर्व कारखाने बंद केले जाणार आहेत.
काय आहेत मागण्या?
- मुकादमांना 19 टक्के ऐवजी 35 टक्के कमिशन दिले जावे.
- ऊस तोडणीसाठी मजुरांना दिल्या जाणाऱ्या दरात दुप्पट वाढ करावी.
- ट्रॅक्टर आणि ट्रकमधून होणाऱ्या वाहतुकीच्या दरामध्ये वाढ करावी.
- ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी प्रत्येक तालुक्यात शाळा आणि वस्तीग्रह उभारावे.
Havaman Andaj । मोठी बातमी! राज्याला पुन्हा बसणार अवकाळीचा फटका, शेतकऱ्यांवर अस्मानी संकट