Eknath Shinde

Eknath Shinde । शेतकरी बापाने कर्जाला कंटाळून केली आत्महत्या, चिमुकलीने मुख्यमंत्र्यांना लिहिलं भावनिक पत्र; वाचून येईल डोळ्यात पाणी

बातम्या

Eknath Shinde । हिंगोली जिल्ह्यातील शेगाव खोडके गावात आठव्या वर्गात शिकणाऱ्या एका शेतकऱ्याच्या मुलीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. तिने या पत्रात म्हटले आहे की, माझे वडील देवाच्या घरी गेले आहेत. तुम्ही माझ्या बाबांना घरी परत पाठवा. माझ्या वडिलांना सांगा की तुमची मुलगी घरी वाट पाहत आहे…असे पत्र लिहिले आहे.

Dairy Farming । ‘या’ आहेत गायींच्या टॉप 3 जाती आहेत, गोठ्यात आणाल तर मालामाल व्हाल; जाणून घ्या सविस्तर माहिती

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मागच्या काही दिवसांपूर्वी सेगाव येथील शेतकरी नारायण खोडके यांनी शेतीतील नापिकी आणि कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती. मृत शेतकरी नारायण यांची मुलगी किरण खोडके हिने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून वडिलांच्या मृत्यूला सरकारी यंत्रणाच जबाबदार असल्याचे त्यांचे मत व्यक्त केले आहे.

Poultry Farming | सावधान! हिवाळ्यात कोंबड्यांची अशी काळजी घ्याच, अन्यथा निर्माण होईल धोका…

आठवीत शिकणाऱ्या किरणने मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र लिहिले आहे की, एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही दसरा मोठ्या थाटामाटात साजरा केला, कदाचित तुम्ही दिवाळीही चांगली साजरी कराल. पण माझ्या घरात ना दसरा साजरी झाली ना दिवाळी साजरी होणार. माझी आई रडते. सोयाबीनचे भाव चांगले असते तर कदाचित माझे वडील मेले नसते,या असं त्या मुलीने पत्रात म्हंटले आहे.

Success Story | शेतकऱ्याचा नादच खुळा! शेळीपालनातून कमावले ५ कोटी रुपयांचे उत्पन्न

या मुलीने पत्रात पुढे लिहिले की, सर, आम्ही तीन बहिणी आणि एक भाऊ आहोत. आम्ही रोज बाबा घरी येण्याची वाट बघतो पण ते अजून आले नाहीत. बाबा परत आले नाही तर बाजारात कोण घेऊन जाणार? नवीन कपडे कोण घेणार? तुमचे वडील गेल्यावर तुमची दिवाळी चांगली गेली असती का? लोक म्हणतात सरकारमुळे तुमचे बाप देवाच्या घरी गेले. हे खरे आहे का? देवाला सांगा आणि माझ्या बाबांना घरी पाठवा. दिवाळीसाठी बाजारात जावे लागते. असं देखील मुलीने पात्रात म्हंटले आहे.

Carrot Farming | गाजराची शेती करताय? तर ही माहिती नक्की वाचा आणि मिळवा भरघोस उत्पादन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *