Carrot Farming

Carrot Farming | गाजराची शेती करताय? तर ही माहिती नक्की वाचा आणि मिळवा भरघोस उत्पादन

कृषी सल्ला

Carrot Farming | रब्बी हंगामात (Winter Season) शेतकरी आवर्जून गाजराची शेती करतात. गाजर हे आहारातील एक महत्त्वाचे कंदमुळ म्हणून ओळखले जाते. यामध्ये असणाऱ्या विविध पोषण घटकांमुळे गाजराला बाजारात मोठी मागणी असते. यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात गाजराची शेती करतात. या हंगामात गाजराच्या शेतीचे योग्य व्यवस्थापन केले तर शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होतो.

Narendr Modi । शेतकऱ्यांसाठी शरद पवारांनी 60 वर्षात काय केलं? नरेंद्र मोदींचा सवाल

गाजराची शेती करण्यासाठी शेतीची पूर्वमशागत करणे आवश्यक असते. यामध्ये जमीन व्यवस्थित नांगरून तणमुक्त करावी लागते. तसेच जमल्यास माती परीक्षण देखील करून घ्यावे. कारण 5.5 ते 7 च्या दरम्यान PH असणाऱ्या मातीमध्ये गाजराचे चांगले उत्पादन येते.

गाजराच्या लागवडीसाठी जाती

गाजराची शेती करण्यासाठी तुम्ही गाजरांच्या विविध जातींची निवड करू शकतात. यामध्ये आशियायी जाती आणि युरोपीय जाती हे दोन वाण लोकप्रिय आहेत. यामधील आशियायी जातीचे वाण ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीमध्ये पेरले जाते. ही गाजरे आकाराने मोठी असतात, तसेच त्याचा गाभा कठीण असतो. या जातीची गजरे रंगाने तांबडी आणि काळसर पिवळी असतात. पुसा केशर, पुसा मेघाली, सिलेक्शन 229 या गाजराच्या सुधारीत जाती आहेत.

Fertilizer prices । खुशखबर! रब्बी हंगामात खतांच्या किंमती होणार कमी, युरियाच्या दरातही होणार घट

तसेच युरोपीय जातीची गाजरे ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत लावली जातात. ही गाजरे खाताना कोरडी राहतात परंतु, लवकर काढणीला तयार होतात. नँटेज, चॅटनी, पुसा जमदग्नी या गाजराच्या सुधारीत जाती आहेत. हे गाजराचे पीक किमान 90 दिवसांत तयार होते.

Sugarcane FRP | उसाला प्रतिटन पाच हजार रुपये दर द्यावा! शेतकरी संघटना आक्रमक; आंदोलनाचा दिला इशारा

गाजराच्या पिकातील तण व्यवस्थापन

गाजराच्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात तण वाढते. हे अनावश्यक तण जमिनीतील ओलावा आणि पोषक घटक शोषून घेते. यामुळे गाजर पिकाच्या वाढीवर आणि विकासावर विपरीत परिणाम होतो. म्हणून हे तण नियमितपणे शेतातून काढत राहणे अत्यंत गरजेचे असते.

Market Yard | लासलगाव आणि बारामती बाजार समिती ठरली अव्वल! पणन संचालनालयाने यादी केली जाहीर

गाजराच्या पिकासाठी खताचे आणि पाण्याचे व्यवस्थापन

गाजराच्या शेतात ओले आणि न कुजलेले शेणखत वापरणे टाळावे. तसेच शेवटच्या नांगरणीला सुमारे 25-30 टन चांगले शेणखत, पेरणीच्या वेळी एक हेक्टर शेतात 30 किलो नत्र आणि 30 किलो पोटॅश प्रति हेक्टर वापरावे. याशिवाय पेरणीच्या 5-6 आठवड्यांनंतर 30 किलो वापरावे. गाजराची पेरणी झाल्यानंतर पहिल्यांदा शेताला पाणी द्यावे, त्यामुळे उगवण चांगली होण्यास मदत होईल. तसेच हिवाळ्यात 10-12 दिवसांनी पाणी द्यावे. गाजराला तीन ते चार वेळा पाणी द्यावे लागते. गाजराला जास्त प्रमाणात पाणी देणे टाळावे, यामुळे गाजरांचा आकार विकृत होतो.

Narendr Modi । शेतकऱ्यांसाठी शरद पवारांनी 60 वर्षात काय केलं? नरेंद्र मोदींचा सवाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *