Success Story

Success Story | शेतकऱ्याचा नादच खुळा! शेळीपालनातून कमावले ५ कोटी रुपयांचे उत्पन्न

यशोगाथा

Success Story | शेती हा निसर्गावर अवलंबून असणारा व्यवसाय आहे. सध्याची परिस्थिती पाहता निसर्गाचा समतोल बिघडला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. तसेच उत्पन्न देखील चांगले मिळेल याची शाश्वती नसते. म्हणून शेतकरी शेतीपूरक व्यवसाय करण्यावर जास्त भर देतात. सरकार देखील शेतीपूरक व्यवसायांसाठी शेतकऱ्यांना मदत करते. मत्स्यपालन, कुक्कुटपालन, शेळीपालन यांसारख्या व्यवसायांचा यामध्ये समावेश होतो.

Sugarcane FRP | उसाला प्रतिटन पाच हजार रुपये दर द्यावा! शेतकरी संघटना आक्रमक; आंदोलनाचा दिला इशारा

सांगली जिल्ह्यातील एका शेतकरी मित्राने शेळीपालन ( Goat Farming) करून कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. खानापूर तालुक्यातील बामणी गावामधील तेजस लेंगरे 2006 पासून शेळीपालन करत आहेत. सुरुवातीच्या काळात आफ्रिकन बोर जातीची एक शेळी आणि बोकड यांच्यापासून तेजस यांनी शेळीपालनास सुरुवात केली होती. नंतरच्या काळात प्रगती करत तेजस यांनी शेळ्यांची संख्या वाढवत त्यांच्यासाठी शेड सुद्धा बांधले.

Carrot Farming | गाजराची शेती करताय? तर ही माहिती नक्की वाचा आणि मिळवा भरघोस उत्पादन

तेजस लेंगरे यांना शेळी आणि बोकडांच्या विक्रीमधून भांडवल खर्च वजा करता एक कोटी रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळते. महत्त्वाची बाब म्हणजे तेजस शेळीपालनाच्या व्यवसायाबरोबरच शेळ्यांच्या लेंढ्यांपासून गांडूळ खत देखील बनवतात. सध्या त्यांच्याकडे सुमारे 350 शेळ्या असून या शेळ्यांसाठी वीस एकर क्षेत्रात चारा लागवड करण्यात आला आहे.

Fertilizer prices । खुशखबर! रब्बी हंगामात खतांच्या किंमती होणार कमी, युरियाच्या दरातही होणार घट

शेळीपालन करण्यासाठी इच्छुक लोकांना मार्गदर्शन करताना तेजस लेंगरे सांगतात की, शेळीपालन करण्याआधी प्रत्येकाने प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. एकदमच जास्त शेळ्या न विकत घेता जास्तीत जास्त 10 ते 15 शेळ्यांपासूनस शेळीपालनासाठी सुरुवात करावी. तसेच शेळ्यांचा चारा, त्यांचे आजार, पाणी व्यवस्थापन आणि स्वच्छता या बाबींकडे विशेष लक्ष द्यावे.

Market Yard | लासलगाव आणि बारामती बाजार समिती ठरली अव्वल! पणन संचालनालयाने यादी केली जाहीर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *