Fertilizer prices

Fertilizer prices । खुशखबर! रब्बी हंगामात खतांच्या किंमती होणार कमी, युरियाच्या दरातही होणार घट

बातम्या

Fertilizer prices । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi) यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान योजनेचा शुभारंभ झाला. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान शेतकऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये (Cabinate meeting) केंद्र सरकारने खतांच्या किंमती कमी केल्या आहेत.

Narendr Modi । शेतकऱ्यांसाठी शरद पवारांनी 60 वर्षात काय केलं? नरेंद्र मोदींचा सवाल

यंदाच्या रब्बी हंगामाच्या (Winter Session) अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला असून केंद्र सरकारने फॉस्फेट आणि पोटॅश खतांसाठी 22,303 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. 1 ऑक्टोबर 2023 ते 31 मार्च 2024 पर्यंत हे अनुदान सुरू असणार आहे. यामध्ये नायट्रोजनसाठी 42.2 रुपये प्रति किलो, फॉस्फरससाठी 20.82 रुपये प्रति किलो, पोटॅशसाठी 2.38 रुपये प्रति किलो, सल्फरसाठी 1.89 रुपये प्रति किलो अनुदान मिळणार आहे.

Market Yard | लासलगाव आणि बारामती बाजार समिती ठरली अव्वल! पणन संचालनालयाने यादी केली जाहीर

मंत्रिमंडळ बैठकीतील इतर महत्त्वाचे निर्णय

1) खतांच्या किमतींवरील अनुदान कायम राहील.
2) एनबीएस अंतर्गत शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किंमतीत खते मिळणार.
3) युरियाच्या दरात वाढ केली जाणार नाही.
4) रब्बी हंगामासाठी पोषक तत्वावर आधारित अनुदान दिले जाणार.

Onion Rate । कांद्याला आज सर्वाधिक किती दर मिळाला? जाणून घ्या एका क्लिकवर

आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या वाढत्या किमती वाढल्या तरी त्याचा परिणाम भारतातील शेतकऱ्यांवर होऊ देणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे. मागील दोन वर्षांपासूनच शेतकऱ्यांवर अतिरिक्त बोजा पडू नये अशा पद्धतीने अनुदान दराचे व्यवस्थापन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *