Narendr Modi । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी या ठिकाणी जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले आणि विविध विकासकामांचे लोकार्पण देखील नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. शरद पवार यांनी ६० वर्षांत शेतकऱ्यांसाठी काय केलं? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.
याबाबत बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, “महाराष्ट्राच्या काही वरिष्ठ नेत्यांनी शेतकऱ्यांच्या नावाने फक्त राजकारणच केले आहे. महाराष्ट्रातील एक वरिष्ठ नेता, केंद्रामध्ये कृषी मंत्री राहिलेला नेता. व्यक्तिगत मी त्यांचा आदर करतो, मात्र मागच्या ६० वर्षांमध्ये शेतकऱ्यांसाठी काय केलं आहे? असा प्रश्न यावेळी पंतप्रधान मोदी यांनी केला आहे.
60 वर्षांच्या कार्यकाळामध्ये शरद पवारांनी देशभरातील शेतकऱ्यांकडून साडेतीन लाख कोटी रुपयांच्या एमएसपीवर अन्नधान्य खरेदी केले. २०१४ च्या आधी देखील शेतकऱ्यांच्या मालाची ५०० ते ६०० कोटी रुपयांची एमएसपीवर खरेदी व्हायची, आमच्या सरकारने १ लाख १५ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत, असं यावेळी मोदी म्हणाले आहेत.
शरद पवार कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांना अनेक महिने पैसे मिळत नव्हते. आमच्या सरकारने एमएसपीचा पैसा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.