Navrdev B.Sc. Agri । मागील काही दिवसांपासून ‘नवरदेव बीएससी ॲग्री’ या मराठी सिनेमाची (Navrdev B.Sc. Agri Movie) सर्वांना उत्सुकता लागली आहे. शेतकरी राजाची गोष्ट सिनेमातून मांडण्यात आली आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर (Navrdev B.Sc. Agri Movie Trailer) रिलीज झाला आहे. सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. येत्या २६ जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
प्रेक्षकांना अभिनेता क्षितीश दाते (Kshitish Date) पहिल्यांदाच हा तरूण शेतकऱ्याच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. बीएससी अॅग्री केलेल्या राजवर्धनला लग्नासाठी कोणत्या अडचणींना तोंड द्यावं लागतं, त्याला नवरी मिळते की नाही, याची कथा आपल्याला या सिनेमामधून पाहायला मिळणार आहे. दरम्यान, या सिनेमाचे राम खाटमोडे (Ram Khatmode) हे दिग्दर्शक आहेत.
शेतकऱ्याने तंत्रज्ञानाच्या मदतीने कितीही शेती विकसित केली, त्याने शेतीत कितीही प्रगती केली तरीही आज त्याला लग्नासाठी मुलगी मिळत नाही. या सिनेमातील तरूण शेतकरी गावकऱ्यांना एकत्र करुन प्रगत शेती करत आहे. तो सर्वांना जिद्दीने लढायला शिकवतोय. असे असूनही नवरीचे आई-वडिल नोकरदार मुलांनाच आपल्या मुली देण्याची इच्छा व्यक्त करत आहेत.
Dairy Industry । दूध व्यवसायामुळे लागला संसाराला आर्थिक हातभार, कसं केलं नियोजन? जाणून घ्या..
‘लाल चिखल’ रॅप उतरले नेटकऱ्यांच्या पसंतीस
आर्यन्स एज्युटेन्मेंट प्रस्तुत, मिलिंद लडगे निर्मित हा सिनेमा आहे. या सिनेमामध्ये अभिनेते मकरंद अनासपुरे, प्रवीण तरडे, प्रियदर्शिनी इंदलकर, संदीप पाठक, गार्गी फुले, रमेश परदेशी, हार्दिक जोशी, नेहा शितोळे, तानाजी गळगुंडे, विनोद वणवे असे कलाकार देखील आहेत. महत्त्वाचे म्हणजे काही दिवसांपूर्वी रिलीज झालेलं या चित्रपटातील ‘लाल चिखल’ हे रॅप नेटकऱ्यांना खूप आवडले आहे.