Process of sugar production । भारतात मोठ्या प्रमाणावर उसाची शेती (Sugarcane farming) करण्यात येते. हे पीक भरघोस उत्पन्न मिळवून देते, त्यामुळे अनेकजण उसाची लागवड (Cultivation of sugarcane) करतात. उसाच्या अनेक जाती आहेत, तुम्ही जास्त उत्पन्न मिळवून देणाऱ्या जातीची लागवड करू शकता. सध्या उसाची तोडणी सुरु आहे. अनेकांना ऊसापासून साखर (Sugar from cane) कशी बनवतात हा प्रश्न पडतो. जाणून घेऊयात याबद्दल माहिती.
अशी तयार होते साखर
दैनंदिन जीवनात साखरेला खूप महत्त्व आहे. सकाळच्या चहापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंतच्या आहारात आपण साखरेचा समावेश करत असतो. काहीजणांना गोड पदार्थ खूप आवडतात. साखर तयार करण्याची कारखान्यातील प्रक्रिया थोडी वेगळी असते. (Sugar production) ऊस कारखान्यात गेल्यानंतर उसावर प्रक्रिया सुरु होते. किकरच्या मदतीने सुरुवातील उसाची लेव्हल करून ऊस बारीक करतात. (Sugar production information)
फायबर रायजर मध्ये पूर्ण भुगा केल्यास रोटरी स्किल रस गळून येतो. 33*66 या उल्का मिलमध्ये रस काढून उल्का मिलनंतर उरलेल्या चार मिलमध्ये पुन्हा रस काढण्याचे काम सुरु होते. यानंतर एलवेटरच्या माध्यमातून पूर्ण कोरडा भुसा बाहेर पडून थेट बॉयलर जातो. हा भुसा बॉयलरसाठी वापरतात. त्यानंतर वेगळा केलेल्या ऊसाच्या रसाची कारखान्यात असलेल्या प्रयोगशाळेत गुणवत्ता पाहिली जाते.
Dairy Industry । दूध व्यवसायामुळे लागला संसाराला आर्थिक हातभार, कसं केलं नियोजन? जाणून घ्या..
प्रयोगशाळेत तपासणी केलेला उच्च प्रतीचा रस पुढे प्रक्रिया हाऊसमध्ये पुढील प्रक्रिया करण्यासाठी पाठवतात. यानंतर यात वेफर सेल तथा हिटर मध्ये रस उकळवण्यात येतो. यावर चार ते पाच वेळा प्रक्रिया करून हाफरच्या माध्यमातून साखर थंड करतात. ग्रेडरच्या माध्यमातून साखरेच्या तीन ग्रेड करण्यात येतात. या ठिकाणी सायलो आटोमॅटिक काट्याच्या साहाय्याने 50 किलोचे पोते तयार केले जाते. एका मिनिटात एकूण 13 पोते साखर तयार होते.
साखरेच्या प्रति
हे लक्षात घ्या की, भारतात आकारमानानुसार साखरेच्या एल, एम व एस अशा तीन प्रती प्रचलित असून साखरेचे शुभ्रतेनुसार २९, ३० व ३१ अंक असे गट आहेत. दरम्यान, पांढऱ्या साखरेमध्ये ४० ते ७० पीपीएम इतका गंधकाचा अंश असतो. गंधकाचा इतका अंश असणारी साखर आरोग्यास बाधक असल्याने खाद्यान्नांत तिचा वापर केला जात नाही.
Fish Food । तांदूळ माशांना खायला देता येते का? जाणून घ्या माशांच्या अन्नाबद्दल सविस्तर माहिती