Dairy Industry । अनेकांना शेतीतून जास्त कमाई न करता आल्याने दूध व्यवसाय (Milk business) करतात. राज्यात शेतीसोबत दूध व्यवसाय करणाऱ्यांची जास्त आहे. या व्यवसायामुळे आर्थिक हातभार लागण्यास मदत होते. जर तुम्हालाही या व्यवसायात जास्त नफा मिळवायचा असेल तर तुम्हाला योग्य ते नियोजन, कष्ट आणि जास्त नफा मिळवून देणाऱ्या जनावरांची निवड करावी लागते.
असे केले नियोजन
सातारा (Satara) जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील मांडवखडक या गावातील एका दाम्पत्याने दूध व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबाचे विभाजन झाल्यानंतर २०१४ साली त्यांच्याकडे फक्त अर्धा एकर शेती आणि दोन बैल होती. ते स्वतःची आणि थोडी वाट्याने शेती करून संसार करत होते. याच वर्षी त्यांनी त्यांनी दुग्ध व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. (Milk business in Phaltan)
Fish Food । तांदूळ माशांना खायला देता येते का? जाणून घ्या माशांच्या अन्नाबद्दल सविस्तर माहिती
आरती आणि अप्पासो नामदेव सस्ते (Appaso Namdev Saste) असे या दाम्पत्याचे नाव आहे. त्यांनी सुरुवातीला या व्यवसायाची सुरुवात एका गाईपासून केली. विशेष म्हणजे वाणिज्य पदवीधर असणाऱ्या आरतीताईंना या व्यवसायातील कोणताही अनुभव नव्हता. पण तरीही त्यांनी व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांनी खरेदी केलेली गाभण गायी प्रसूतीवेळीच मरण पावली. निराश न होता त्यांनी बैल विकून दुसरी एच.एफ. गाईची खरेदी केली.
गाईची संगोपन करत त्यांना दहा ते १२ लिटर दूध या गाईपासून मिळत होते. त्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळत होते. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी पहिल्या गायीचा भाकड काळ सुरू होण्यापूर्वी दुसऱ्या बैलाची विक्री करून दुसरी गाय खरेदी केली. यानंतर पुढील तीन चार वर्षे वासरांपासून गायींची संख्या पाचपर्यंत वाढून त्यांनी बंदिस्त संगोपन करण्याचं ठरवले.
मिळत आहे चांगले उत्पन्न
सध्या त्यांच्याकडे १०० बाय ४० फूट मुक्तसंचार गोठा केला आहे. आज त्यांच्याकडे लहान-मोठ्या अशा तब्बल ३० गायी आहेत. यामध्ये एचएफ जातीच्या २९, एक जर्शी आणि एक देशी गाय आहे. त्यांच्यापासून दोन्ही वेळचे मिळून प्रतिदिवस एकूण २७० लिटर दूध मिळत आहे. सरासरी २८ रुपये दराने या दुधाचे साडेसात हजार रुपये उत्पन्न येते. खर्च वजा जाता एक ते दीड हजार रुपये त्यांच्याकडे शिल्लक राहतात. इतकेच नाही तर ते दरमहा शेणखताची विक्री करतात. त्यातून देखील त्यांना चांगला नफा मिळतो.
Leopard Attack । आईवडील ऊस तोडण्यात रमले, बिबट्याने चिमुरडीवर केला हल्ला; पोटचा गोळा डोळ्यादेखत गेला